अर्णवबाबत भाजपा आता गप्प का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:06+5:302021-01-19T04:13:06+5:30
पुणे : राज्य सरकारने अर्णव गोस्वामी यांच्यावर कायदेशीर कारणावरून गुन्हा दाखल केला तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी राज्यात आंदोलन ...
पुणे : राज्य सरकारने अर्णव गोस्वामी यांच्यावर कायदेशीर कारणावरून गुन्हा दाखल केला तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी राज्यात आंदोलन केले. आता त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा भंग केल्याचा संशय व्यक्त केला जात असताना भाजपाचे नेते गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांनी केला आहे.
टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पाच हजार पानी आरोपपत्र सादर केले. त्या वेळी राज्य सरकार सूडबुद्धीने वागत असल्याची टीका भाजपाने केली होती. आता बालाकोट येथील लष्करी कारवाईची माहिती ती होण्याआधी तीन दिवस गोस्वामींना माहिती होती. त्यात त्यांनी भाजपाला याचा निवडणुकीत राजकीय फायदा होणार असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ भाजपाने निव्वळ राजकीय हेतूने ही कारवाई केली असा होतो. तपासात सत्य उघड होईल, पण आता शहा किंवा फडणवीस त्यांना पाठीशी का घालतात हे त्यांनी स्पष्ट करावी, अशी मागणी छाजेड यांनी केली आहे.