इंदापूरमध्ये भाजपा शिक्षक आघाडीचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:09+5:302021-09-09T04:15:09+5:30

सकाळी बाबा चौक ते पंचायत समितीपर्यंत शिक्षकांच्या मोर्चात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर पंचायत समितीच्या आवारामध्ये धरणे आंदोलन ...

BJP teachers' front dam agitation in Indapur | इंदापूरमध्ये भाजपा शिक्षक आघाडीचे धरणे आंदोलन

इंदापूरमध्ये भाजपा शिक्षक आघाडीचे धरणे आंदोलन

Next

सकाळी बाबा चौक ते पंचायत समितीपर्यंत शिक्षकांच्या मोर्चात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर पंचायत समितीच्या आवारामध्ये धरणे आंदोलन करून शिक्षकांना आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर आंदोलनातील शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे आणि पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मागण्यांची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शालेय राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, शालेय शिक्षण विभागाचे अप्पर सचिव वंदना कृष्णा यांना लेखी निवेदन दिले आहे.

मागण्या अशा...

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाच्या तारखा तात्काळ घोषित कराव्यात, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तात्काळ सुरू करावे, एक तारखेला वेतन मिळण्याबाबत व वेतनास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम तात्काळ देय करावी, परिविक्षाधीन सहायक शिक्षक (शिक्षण सेवक) परिविक्षाधीन शिक्षकेतर कर्मचारी (शिक्षकेतर सेवक) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवावे, शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्रिस्तरीय १०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू कराव्यात, घोषित, अघोषित व मूल्यांकनास पात्र तुकड्या, शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करावी. रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांना १७ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार पूर्णकालीन कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ मिळावेत.

--

फोटो क्रमांक : ०८ इंदापूर शिक्षक आंदोलन

फोटो ओळी : इंदापूर शिक्षक आंदोलन

फोटो ओळ : इंदापूर येथे धरणे आंदोलन करताना भाजपा शिक्षक आघाडी.

Web Title: BJP teachers' front dam agitation in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.