भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:53 PM2024-09-21T12:53:49+5:302024-09-21T12:55:26+5:30

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

BJP to help Sharad Pawars NCP in Maval Serious accusation of mla Sunil Shelke | भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप

भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप

NCP Sunil Shelke ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीपासून सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष रंगला असून या संघर्षाचा दुसरा अंक आता विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण महायुतीतील विविध आमदार घटकपक्षांच्या नेत्यांवर जाहीर व्यासपीठांवरून टीका करत आहेत. अशातच मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

सुनील शेळके यांनी म्हटलं आहे की, "लोकसभेच्या निवडणुकीला जे बोलत होते ते आता गावोगावी जाऊन सांगत आहेत की, अजित पवारांनी गोळीबाराचे आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांना शहीद व्हावं लागलं. त्यामुळे अजितदादांच्या पक्षाला मदत करायची नाही. अशा प्रकारचं आता बोलू लागल्यामुळे याला राजकीय वास येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना भडकवायचं आणि संभ्रमित करायचं काम सुरू आहे. आपण पक्षाचे निष्ठावंत असल्याचं सांगायचं, मात्र आतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करायचे प्रयत्न सुरू आहेत," असा आरोप शेळके यांनी केला आहे.

दरम्यान, मावळ मतदारसंघात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे आमदार आहेत. मात्र हा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या भाजपकडे राहिला असून ही जागा आम्हालाच मिळावी, अशी मागणी यापूर्वीच मतदारसंघातील माजी आमदार बाळा भेगडे यांनी केली होती. त्यानंतर आता शेळके यांनी भाजपर थेट आरोप केल्याने मावळमधील राजकीय संघर्ष आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

Web Title: BJP to help Sharad Pawars NCP in Maval Serious accusation of mla Sunil Shelke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.