भाजपकडून आचारसंहितेचा भंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:30 AM2019-04-01T03:30:39+5:302019-04-01T03:31:01+5:30

वडगाव शेरी निवडणूक कार्यालय : परवानगी न घेता बैठकीचे आयोजन, गुन्हा दाखल

BJP violates code of conduct | भाजपकडून आचारसंहितेचा भंग

भाजपकडून आचारसंहितेचा भंग

Next

चंदननगर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने २७ मार्च रोजी वडगावशेरी येथे लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु बैठकीसाठी कायदेशीर परवानगी घेतली नसल्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

नगर रस्त्यावर इनॉर्बिट मॉल शेजारी शिवांजली मंगल कार्यालयात भाजप उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. या बैठकीला चंदननगर पोलीस ठाण्याकडून कोणतीही परवानगी न घेता आयोजित केली होती. या बैठकीला स्पीकर लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून फिर्यादी ए. पी. ओव्हाळ, राज्यकर अधिकारी विक्रीकर भवन यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक १३ मार्चपासून वडगावशेरी निवडणूक कार्यालयाने भरारी पथकातील प्रमुख नेमणूक करण्यात आली आहे. यांनी आरोपी भाजपचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष संतोष लक्ष्मण राजगुरू यांच्या विरोधात आदर्श आचारसंहिता भंगचा १३३/२०१८ भा.दं.वि. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

या बैठकीला भाजपचे वडगावशेरी अध्यक्ष संतोष राजगुरू यांनी परवानगी मागितली होती मात्र ही परवानगी आचारसंहितेमध्ये किमान २४ ते ४८ तास अगोदर मागणे गरजेचे असून ती उशिरा मागितल्यामुळे परवानगी देऊ शकलो नाहीत व त्यांच्यावर कलम १८८ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
- कृष्णा इंदलकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणे

बैठकीला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे या बैठक आयोजकावर आदर्श आचारसहिंता भंग केल्याप्रकरणी मी स्वत: चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
- एन. पी. ओव्हाळ,
भरारी पथक प्रमुख, वडगावशेरी विधानसभा

४८ तास अगोदर परवानगी
४निवडणुकीत किमान ४८ तास आगोदर प्रचार रॅली, बैठका, सभा, कोपरा सभा आदींसाठी किमान ४८ तास अगोदर परवानगी मागणे गरजेचे असून, निवडणुकीत सर्वांची बाजू, ठिकाण पाहूनच परवानगी देण्यात येते.
 

Web Title: BJP violates code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.