स्थायी व शिक्षण समिती निवडणुकीसाठी भाजपने बजावला व्हीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:49+5:302021-03-05T04:11:49+5:30
पुणे : महापालिकेच्या स्थायी व शिक्षण समितीच्या निवडणुकींसाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना व्हिप बजावला आहे. एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या नगरसेवकांना ...
पुणे : महापालिकेच्या स्थायी व शिक्षण समितीच्या निवडणुकींसाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना व्हिप बजावला आहे.
एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या नगरसेवकांना व्हिप बजावत आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची तंबी दिली आहे. हा व्हिप म्हणजे नेहेमीच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. मात्र भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा व नुकताच सांगली महापालिका निवडणुकीतील सत्ता असून झालेला पराभव ताजा असल्याने हा व्हिप बजाविल्याचे बोलले जात आहे.
पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची व शिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. ५) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आले आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनी तर, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने मंजुश्री खर्डेकर तर उपाध्यक्षपदासाठी कलिंदा पुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बंडू गायकवाड व शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी सुमन पठारे यांनी अर्ज दाखल केला आहे़ तर शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला आहे़