माजी गृहमंत्री यांच्या सीबीआय विषयीच्या आरोपांबाबत भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 05:16 PM2021-04-25T17:16:42+5:302021-04-25T17:17:27+5:30

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

The BJP will file a contempt petition in the high court against the former home minister's allegations against the CBI | माजी गृहमंत्री यांच्या सीबीआय विषयीच्या आरोपांबाबत भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल

माजी गृहमंत्री यांच्या सीबीआय विषयीच्या आरोपांबाबत भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल

Next
ठळक मुद्देप्रकरणाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रारही निरर्थक

पिंपरी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू असली तरीही ही चौकशी म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.  हा आरोप म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान असून भाजपा त्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल करेल. असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरीत दिला आहे.

पाटील म्हणाले की, उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचा आदेश देताना गरज असल्यास गुन्हा नोंदविण्याचाही आदेश दिला होता. न्यायालयाचे निकालपत्र वाचले तर हे स्पष्ट होते. त्यामुळे केवळ चौकशीचा आदेश दिला होता तरीही गुन्हा नोंदवून छापे मारले ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रारही निरर्थक आहे.

महाविकास आघाडीवर निशाणा साधत ते म्हणाले,  शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सोईच्या भूमिका असतात. त्यांना अनुकूल निकाल लागला की न्यायालय चांगले आणि प्रतिकूल आदेश आला की शंका उपस्थित करतात. ईव्हीएम मशिनबाबतची त्यांची भूमिकाही निवडणुकीत विजय मिळाला अथवा पराभव झाला यानुसार बदलते. अशी ‘हम करे सो कायदा’, ही त्यांची भूमिका लोकशाहीत चालणार नाही. भारतीय जनता पार्टीला जनतेने विधानसभा निवडणुकीत जनादेश दिला होता. विश्वासघात झाल्यामुळे भाजपा सत्ताधारी होण्याच्या ऐवजी विरोधी पक्ष झाला. परंतु, विरोधी पक्ष म्हणूनही भाजपा आपली भूमिका गंभीरपणे आणि आक्रमकपणेच पार पाडेल. सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवण्याची विरोधी पक्षाचे काम भाजपा चांगल्या रितीने पार पाडतच राहील. असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: The BJP will file a contempt petition in the high court against the former home minister's allegations against the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.