प्रलंबित प्रश्न भाजप सोडवणार

By admin | Published: October 11, 2014 11:38 PM2014-10-11T23:38:58+5:302014-10-11T23:38:58+5:30

बारामती शहर, तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच प्रयत्न होईल.

The BJP will solve the pending question | प्रलंबित प्रश्न भाजप सोडवणार

प्रलंबित प्रश्न भाजप सोडवणार

Next
>बारामती : बारामती शहर, तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच प्रयत्न होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेडोपाडी सिंचन योजना राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी उपाय योजना आखल्या आहेत. त्यामुळे बारामतीतील मतदार भाजप व मित्रपक्षांच्या पाठिशी उभा राहिला आहे, हे नरेंद्र मोदी यांच्या सभेतून सिद्ध झाले आहे. या पाठिंब्याच्या जोरावरच विधानसभेचे चित्र बदला, असे आवाहन भाजपचे उमेदवार बाळासाहेब गावडे यांनी केले.
गावडे यांनी आज कसबा येथील शिवाजी उद्यान येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून घरोघरी मतदारांशी संपर्क साधला. त्यांच्या समवेत ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रअण्णा तावरे, शेतकरी नेते सतिश काकडे, ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकाते, राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ, स्वाभिमानीचे राजेंद्र ढवाण, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, नगरसेवक सुनिल सस्ते, आरपीआयचे सुनिल शिंदे, जहीर पठाण, गोविंद देवकाते, नितिन भामे आदी उपस्थित होते. कसबा, लक्ष्मीनारायण नगर, सावतामाळीनगर, श्रीरामनगर, कारभारीनगर, जामदार रोड, अण्णाभाऊ साठेनगर, सुतारनेट, पंचशील नगर, काशिविश्वेश्वर मंदिर परिसर, कचेरी रोड, गांधी चौक, वसंतनगर, तीन हत्ती चौक, आमराई, सिद्धार्थनगर, प्रतिभानगर, भीमनगर, वडारकॉलनी, वडकेनगर,कोअरहाऊस, आनंदनगर, साईगणोशनगर आदी भागात त्यांनी पदयात्र काढून मतदारांशी संपर्क साधला. कोटय़ावधींचा निधी येऊन ही नागरी वस्त्यातील विकासाची कामे अपूर्ण आहेत. ठेकेदारांना पोसण्याचे काम केले जाते. त्यामुळे विकास कामांचा खर्च वाढतो. त्यातून गैरप्रकार होतात. पाणी, शेतक:यांना उसाचा दर, कंत्रटी कामगार पद्धत बंद करणो आदी प्रश्न भाजपच्या माध्यमातूनच मार्गी लागतील, असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला. 
 
4भाजपने आता घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. शहराबरोबर काळेवाडी, वढाणो, बोरकरवाडी, कुतवळवाडी, भोंडवेवाडी, मांगोबाचीवाडी, आंबी खुर्द, बुद्रूक, चांदगुडेवाडी, मोरगाव, राजबाग, खैरेपडळ, शेरेवाडी, बाबुर्डी या भागात भाजपचे नेते दिलीप खैरे यांनी कोपरासभा, पदयात्र काढून मतदारांशी संपर्क साधला. खैरे म्हणाले, केवळ निवडणुकीच्या काळात पाणी देण्याचे नाटक करणा:या राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कौले यांच्यासह भाजप आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The BJP will solve the pending question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.