PSI भरती घोटाळाप्रकरणी भाजपच्या महिला नेत्याला पुण्यातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 12:32 PM2022-04-29T12:32:39+5:302022-04-29T12:33:34+5:30
पीएसआय भरती घोटाळाप्रकरणी न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर कर्नाटक सीआयडी आरोपींचा शोध घेत होते
पुणे - कर्नाटकातील पीएसआय भरती घोटाळाप्रकरणी सीआयडीने भाजप नेत्या दिव्या हागारगीला अटक केली आहे. या भरती प्रकरणाती घोटाळ्यात गुन्हे अन्वेशन विभागाने 5 जणांना अटक केली असून प्रमुख आरोपी दिव्या हागारगीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अटक करण्यात आलेली दिव्या ही 18 वी आरोपी आहे. यापूर्वी पोलिसानी दिव्याच्या पतीला अटक केली होती. त्यावेळी, तिने फरार होण्याची संधी साधली होती.
पीएसआय भरती घोटाळाप्रकरणी न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर कर्नाटक सीआयडी आरोपींचा शोध घेत होते. अखेर पीएसआय भरती घोटाळा प्रकरणी दिव्या हागारगी यांना गुरुवारी रात्री पुण्यात अटक करण्यात आली. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुलबर्गा येथील कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. आरोपींनी त्याआधी अटपूर्व जामीनासाटी अर्ज केला होता.
कोण आहेत दिव्या हागारगी
भाजपा नेत्या दिव्या हागारगी या ज्ञान ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रमुख आहेत. तसेच, कलबुर्गी येथील भाजपच्या महिला युनिटच्या अध्यक्षा होत्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर पक्षानं तिची हकालपट्टी करुन पक्षाचा याच्याशी काहीह संबंध नसल्याचं सांगितलं. भरतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिव्याची भेट घेतली होती.