नियोजनबद्ध नीतीने भाजपाने जिंकला गड

By admin | Published: February 25, 2017 02:24 AM2017-02-25T02:24:16+5:302017-02-25T02:24:16+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेत १५ वर्षांपासून राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पूर्वीच्या बारामती लोकसभा

The BJP won the planned policy | नियोजनबद्ध नीतीने भाजपाने जिंकला गड

नियोजनबद्ध नीतीने भाजपाने जिंकला गड

Next

संजय माने, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत १५ वर्षांपासून राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पूर्वीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा भाग मानला जातो. . पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कारभारी असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या बालेकिल्ल्यात नियोजनबद्ध चाणक्य नीतीने भाजपाने स्पष्ट बहुमताची मुसंडी मारली आहे. मात्र, राष्ट्रवादीला कितीही पोखरले तरी, विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक सहज जिंकता येईल, या गाफीलपणाचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे.
महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभाग फेररचनेपासून भाजपाने या निवडणुकीचे नियोजन केले होते. छोट्या आकारातील प्रभाग असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांना मनी आणि मसल पॉवरच्या बळावर निवडणूक जिंकणे सोपे होत असते. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून निवडणूक लढणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात नव्हती. निवडून येईल तो आपलाच, हेच तत्त्व त्यांनी अंगीकारले होते. प्रभागाचा विस्तार झाल्यास मनी आणि मसल पॉवरचा त्यांचा प्रभाव कमी होऊ शकेल, हे भाजपाने हेरले. प्रभाग फेररचनेत ५० हजार मतदारांचा एक प्रभाग झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काहींचा त्या त्या प्रभागात प्रभाव होता, त्या विशिष्ट भागात त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी होत होते. चार उमेदवारांचा एक प्रभाग केल्याने त्यांचे विशिष्ट भागापुरतेच वर्चस्व राहिल्याने ऐनवेळी विस्तारित भागातील मतांसाठी धावधाव करण्याची वेळ त्यांच्यावर आली.
भाजपाने प्रभागाच्या नियोजनानंतर देशात नोटांबदीचा निर्णय लागू केला. त्यामुळे शहरातील धनदांडगे निवडणुकीपूर्वीच आर्थिकदृष्ट्या अडचणी आले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांना भाजपाकडे वळविले. त्यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे, पाठोपाठ पिंपरी विधानसभा मतदार संघात ज्यांचे प्राबल्य आहे, असे माजी महापौर आझम पानसरे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. चिंचवडला भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्राबल्य होतेच.

Web Title: The BJP won the planned policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.