...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण
By राजू इनामदार | Published: April 11, 2024 06:32 PM2024-04-11T18:32:45+5:302024-04-11T18:32:58+5:30
शेतकऱ्यांना मदत करता तर मग खतांवर जीएसटी का लावता? तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा
पुणे: आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये प्रवेश केला. शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार.डॉ. अमोल कोल्हे यावेळी उपस्थित होते. आळंदी विधानसभा क्षेत्रातील देशमुख यांच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
पवार म्हणाले, एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे असा प्रकार केंद्र सरकार करत आहे. शेतकऱ्यांना मदत करता तर मग खतांवर जीएसटी का लावता? तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा. देशमुख तो विचार करून भाजपमधून राष्ट्रवादीत आले हे महत्वाचे आहे.
डॉ. कोल्हे म्हणाले,"संकट आले.की त्याला शरण जायचा पर्याय असतो. केंद्र राज्य यांनी अन्याय चालवलायच, पण पक्षातही फूट पडली. अशा वेळी खंबीरपणे उभे राहून या संकटाचा सामना करणारे शरद पवार उर्जा आहेत. अतूल देशमुख यांच्यासारखे स्वाभिमान जाग्रुत असणारे अनेकजण शरद पवार यांच्याबरोबर येत आहेत. ही तुतारी स्वाभिमानाची तुतारी आहे. यापुढे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाला.घालणार्यांच्या व त्यांना साथ देणार्या़च्या विरोधात लढू.
अतुल देशमुख यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. थोड्याच मतांच्या फरकाने त्यांचा दिलीप मोहिते यांच्याकडून पराभव झाला होता. दिलीप मोहिते राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्याबऱबर गेले आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर देशमुख म्हणाले की, मागील अडीच वर्षात स्वाभिमानाला ठेच लागली. समन्वयही साधता आला नाही. मागील एक दीड वर्षात हीन वागणूक मिळाल्याने हा निर्णय घेतला आहे.