भाजपासमोर मनसेचे आव्हान
By admin | Published: November 7, 2016 01:40 AM2016-11-07T01:40:59+5:302016-11-07T01:40:59+5:30
कसबा मतदारसंघातील भाजपाचा परंपरागत बालेकिल्ला असलेला बहुतांश भाग प्रभाग क्रमांक १५ मध्ये समाविष्ट झाला आहे.
पुणे : कसबा मतदारसंघातील भाजपाचा परंपरागत बालेकिल्ला असलेला बहुतांश भाग प्रभाग क्रमांक १५ मध्ये समाविष्ट झाला आहे. या बालेकिल्ल्यात मागील वेळेस अनपेक्षितपणे बाजी मारलेल्या मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे यांचेच यंदाही भाजपासमोर आव्हान असणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकच जागा असल्याने भाजपाचे विद्यमान नगरसेवक दिलीप काळोखे व अशोक येनपुरे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
ऐतिहासिक शनिवार वाडा, महात्मा फुले मंडई, राजा दिनकर केळकर संग्रहालय अशा वैभवशाली वास्तूंचा समावेश प्रभाग क्रमांक १५ मध्ये झालेला आहे. त्याचबरोबर अहिल्यादेवी हायस्कूल मुलींची शाळा, हुजूरपागा, न्यू इंग्लिश स्कूल अशा प्रसिद्ध शाळादेखील याच प्रभागात येतात.
भाजपाचे दिलीप काळोखे, मुक्ता टिळक, हेमंत रासने व मनसेच्या रूपाली पाटील-ठोंबरे या प्रभागातील विद्यमान नगरसेवक आहेत. त्याचबरोबर भाजपाचे नगरसेवक अशोक येनपुरे व प्रतिभा ढमाले यांचाही काही भाग या प्रभागत आला आहे. भाजपाचा मतदार या प्रभागात मोठा असल्याने सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपाचे विद्यमान नगरसेवक काळोखे व येनपुरे यांच्यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.
दाटीवाटीने उभे असलेले वाडे, सोसायट्या या प्रभागात मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे पार्किंगचा प्रश्न प्रभागात मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर प्रभागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न प्रभागात प्रामुख्याने आहेत. काँग्रेसकडून ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी या प्रभागातून निवडणूक लढवावी, असा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडूनही संघटनात्मक कामाच्या जोरावर जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
भाजपाकडून अशोक येनपुरे, दिलीप काळोखे, मुक्ता टिळक, हेमंत रासने, प्रमोद कोंढरे, राजेश येनपुरे, प्रतिभा ढमाले, रागिणी खडके, रत्नदीप खडके, नितीन गुजराथी इच्छुक आहेत.
मनसेकडून रूपाली पाटील-ठोंबरे, गणेश भोकरे, आशिष देवधर, राजाभाऊ सूर्यवंशी, प्रकाश ढमढेरे, मनोज जगदाळे, मनीषा कावेडिया, भारती जगदाळे, नीलेश हांडे, राज कुंजीर, जयश्री पाथरकर, प्रिया सूर्यवंशी इच्छुक आहेत.
काँग्रेसकडून सतीश देसाई, गोपाळ तिवारी, सतीश मोहळ, नीता रजपूत, प्रकाश पवार, विलास वाडेकर, संगीता पवार, बाळासाहेब मालुसरे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील खाटपे, प्रशांत गांधी, विजया दहिफळे, संजय मते, सुरेश बांदल, पुष्पा गाडे इच्छुक आहेत.
शिवसेनेकडून निरंजन दाबेकर, मयूर कडू, मनीषा धारणे, राजाभाऊ भिलारे, नितीन परदेशी इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)
प्रभाग क्रमांक १५ :
शनिवार पेठ- सदाशिव पेठ
प्रमुख परिसर :
शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ (पार्ट), सुभाष नगर, माडीवाले कॉलनी, शनिवार वाडा, महात्मा फुले मंडई, नूतन मराठी विद्यालय, सदाशिव पेठ (पार्ट), राजा दिनकर केळकर संग्रहालय, कबीर बाग, अहिल्यादेवी हायस्कूल मुलींची, हुजूरपागा, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, तुळशीबाग, शनिपार, रेणुका स्वरुप शाळा, भावे हायस्कूल, भरत नाट्य मंदिर, टेलिफोन एक्स्चेंज (बाजीराव रोड) इ.
लोकसंख्या
एकूण लोकसंख्या-
७२८३३
अनुसूचित जाती-
८२१
अनुसूचित जमाती-
४८९
आरक्षण
अ) इतर मागास प्रवर्ग
ब) इतर मागास प्रवर्ग महिला
क) महिला
ड) खुला