पिंपरी चिंचवड उपमहापौरपदी भाजपच्या हिराबाई घुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 05:34 PM2021-03-19T17:34:00+5:302021-03-19T17:34:54+5:30
येत्या मंगळवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब
पिंपरी: उपमहापौरपदासाठी हिराबाई उर्फ नानी घुले यांनी भाजपच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. भाजपची एकमुखी सत्ता असल्याने घुले यांची निवड निश्चित आहे. त्यावर येत्या मंगळवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. भाजपकडून हिराबाई घुले यांचा नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज भरला आहे. महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेविका सीमा सावळे, शर्मिला बाबर, नगरसेवक सागर गवळी, सुरेश भोईर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस कडून पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ, शहर अद्यक्ष संजोग वाघेरे, कार्यअद्यक्ष प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
............
प्रभाग क्रमांक चार दिघी, बोपखेल मधून हिराबाई घुले या भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. मागील चार वर्षात त्यांना एकही पद मिळाले नव्हते. यावेळी भाजपने त्यांना उपमहापौरपदी संधी दिली आहे.
..........
२३ मार्च रोजी निवडणूक
निवडणुकीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मंगळवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा होणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत