सहकारी पक्षाला वाईट वागवण्याची पद्धत भाजपाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:37 AM2020-11-22T09:37:19+5:302020-11-22T09:37:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणूका आम्हीच जिंकणार आहोत, भारतीय जनता पार्टीकडे लक्ष देण्याची ...

BJP's method of treating the co-operative party badly | सहकारी पक्षाला वाईट वागवण्याची पद्धत भाजपाची

सहकारी पक्षाला वाईट वागवण्याची पद्धत भाजपाची

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणूका आम्हीच जिंकणार आहोत, भारतीय जनता पार्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही, सहकारी पक्षाला वाईट वागवण्याची पद्धत त्यांची आहे, आमची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

शिक्षक व पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी (दि. २०) सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी संयुक्त बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. आमदार सतेज पाटील, विश्वजीत कदम, चेतन तुपे, खासदार वंदना चव्हाण, डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे बैठकीस उपस्थित होते.

ऊर्जा खाते कॉंग्रेसकडे असल्याने अर्थमंत्री अजित पवार वाढीव वीज बिले माफ करण्यासाठी त्या खात्याला निधी देत नसल्याची टीका केली जात आहे. याचा समाचार पाटील म्हणाले की, सहकारी पक्षाला भाजपा कसा वागवतो ते गेल्या ५ वर्षात त्यांनी शिवसेनेला दिलेल्या वागणुकीवरून दिसले. आमची तशी पद्धत नाही. मुख्यमंत्री ठाकरे सर्वसहमतीनेच प्रत्येक निर्णय घेतात. फडणविसांच्या सत्ताकाळातच महावितरणची थकबाकी ६७ हजार कोटी झाली. आम्ही त्यातून मार्ग काढतो आहोत. महावितरण वाचले पाहिजे व ग्राहकांनाही दिलासा मिळावा असा उपाय काढण्यासाठी ‘महाआघाडी’ खंबीर आहे.

मुंबई महापालिका तसेच अन्य निवडणूकांना अजून बराच मोठा कालावधी आहे. त्यावेळी काय करायचे याचा निर्णय आता घेणे योग्य नाही असे पाटील यांनी सांगितले. कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता लक्षात घेऊनच मुंबई व अन्य भागात काळजी घ्यायला हवी. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी स्थिती असल्याने स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याची मुभा सरकारने दिली आहे. मुंबईत बसून यवतमाळचा निर्णय कसा घेणार इतकी साधी गोष्ट आहे. त्यामुळे सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याच्या टिकेला अर्थ नाही, असे ते म्हणाले.

Web Title: BJP's method of treating the co-operative party badly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.