पुण्याच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 12:33 PM2019-11-22T12:33:08+5:302019-11-22T12:35:06+5:30

मोहोळ यांच्या विरोधात आघाडीचे प्रकाश कदम यांना पराभव स्वीकारावा लागला.

BJP's Muralidhar Mohol mayor of Pune | पुण्याच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ

पुण्याच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ

Next
ठळक मुद्दे  या निवडणुकीतचे वैशिष्टय म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजप - शिवसेना युती तुटल्याचे पडसाद भाजपला निर्विवाद बहुमतानुसार 97 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदाच्या उमेदवारीकरिता भाजपने मुरलीधर मोहोळ यांचे नाव निश्चित झाली आहे. मोहोळ यांच्या विरोधात आघाडीचे प्रकाश कदम यांना पराभव स्वीकारावा लागला.
  या निवडणुकीतचे वैशिष्टय म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजप - शिवसेना युती तुटल्याचे पडसाद या बघायला मिळाले. यावेळी शिवसेनेने आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले.
    2017साली झालेल्या निवडणुकीनुसार भाजपला निर्विवाद बहुमतानुसार 97 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, मनसे 2 आणि इतर 5 अशी नगरसेवक संख्या महापालिकेत असल्याने मोहोळ यांची निवड निश्चित असल्याचे मानले जात होती. 
आजच्या निवडणुकीत त्यांना 97 तर कदम यांना 59 मते मिळाली. यावेळी मनसेचे 2 नगरसेवक तटस्थ तर पाच नगरसेवक मतदानाच्यावेळी गैरहजर होते. कौस्तुभ दिवेगावकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम बघितले. 


पुणे महापालिकेत 'महाविकास'  आघाडी,शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ
 महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत 'महाविकास' आघाडी करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान केले आहे.


मुरलीधर मोहोळ यांचा अल्पपरिचय

-45 वर्षांचे मुरलीधर मोहोळ हे भाजपतर्फे तीन वेळा नगरसेवक

- शिक्षण :कला शाखेत पदवी

-पुणे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम

-पीएमपीएमएलचे संचालक म्हणूनही केले काम

- भाजपमध्ये युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून सांभाळली जबाबदारी

कोथरूडच्या कामाचे बक्षीस
मोहोळ यांनी कोथरूडमधून आमदारकी लढवण्यासाठी चांगलीच तयारी केली होती. मात्र अचानक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी 'सेफ' मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड करण्यात आली. दुसरीकडे उमेदवारी गेल्यावरही त्यांनी लांबचा विचार करत पाटील यांचा प्रचार करण्याचा मार्ग स्वीकारला आणि आज त्यांना त्याचेच फळ मिळाल्याचे मानले जात आहे.

Web Title: BJP's Muralidhar Mohol mayor of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.