निवडप्रक्रियेचा भाजपाचा नवा पायंडा

By admin | Published: November 27, 2015 01:21 AM2015-11-27T01:21:27+5:302015-11-27T01:21:27+5:30

मंडल ,तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदाधिकाऱ्यांची निवड करताना, भारतीय जनता पक्षात प्रचलित निवडप्रक्रिया राबवली जाते

BJP's new strategy of selection process | निवडप्रक्रियेचा भाजपाचा नवा पायंडा

निवडप्रक्रियेचा भाजपाचा नवा पायंडा

Next

पिंपरी : मंडल ,तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदाधिकाऱ्यांची निवड करताना, भारतीय जनता पक्षात प्रचलित निवडप्रक्रिया राबवली जाते. प्रचलित पद्धतीला फाटा देऊन शहराध्यक्षपदाची निवड करताना नवा पायंडा घातला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शहराध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे.
भाजपाचे निवडणूक अधिकारी खासदार दिलीप गांधी यांनी नुकतीच शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.मंडल प्रभाग स्तरावरील निवडी डिसेंबरअखेपर्यंत गठित केल्या जाणार आहेत, असे सूतोवाच केल्याने शहराध्यक्षपद निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी अन्य पक्षांतून अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविल्यास आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो. या दृष्टीने भाजपातील वरिष्ठ नेते विचार करत आहेत. भाजपातून निवडून आल्यानंतरही आमदार जगताप यांचा राष्ट्रवादीतील नगरसेवकांवर प्रभाव आहे. ते सर्वच बाबतीत प्रबळ असल्याने त्यांची शक्ती काम येईल. राष्ट्रवादीला टक्कर देणे शक्य होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. आमदार जगताप ही जबाबदारी स्वीकारतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा शहराध्यक्षपदाच्या दावेदारांमध्ये नामदेव ढाके, विलास मडिगेरी, उमा खापरे, एकनाथ पवार, माऊली
थोरात या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's new strategy of selection process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.