महापालिकेला भिकारी बनविण्याचे भाजपाचे धोरण, विरोधकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:57 AM2018-08-14T01:57:42+5:302018-08-14T01:57:57+5:30

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) उभारण्यात येत आहे. हा मार्ग महापालिकेच्या हद्दीतून जातो.

BJP's policy of making the beggar of the municipal corporation | महापालिकेला भिकारी बनविण्याचे भाजपाचे धोरण, विरोधकांचा आरोप

महापालिकेला भिकारी बनविण्याचे भाजपाचे धोरण, विरोधकांचा आरोप

Next

पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) उभारण्यात येत आहे. हा मार्ग महापालिकेच्या हद्दीतून जातो. परंतु प्रकल्पाचा निधी उभारण्यासाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूला बांधकाम विकास परवानगीचे अधिकार ‘पीएमआरडीए’ला मिळावेत अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. बांधकाम परवानगीचे अधिकारी पीएमआरडीएला देऊन पुणे महापालिकेला भिकारी बनविण्याचे धोरण राज्यातील सत्ताधारी भाजपाने आखले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला.
तुपे यांनी सांगितले की, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो हा मार्ग पालिका हद्दीतून जातो. या प्रकल्पाचा निधी उभारण्यासाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूला बांधकाम विकास परवानगीचे अधिकार ‘पीएमआरडीए’ला मिळावेत, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. यावर राज्य सरकारने महापालिकेकडून प्रस्तावही मागविला आहे. या मेट्रोसाठी ८ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर उभारला जाणार आहे. त्यासाठी ‘पीएमआरडीए’ने सरकारकडे महापालिका हद्दीत विशेष नियोजन प्राधिकरणचा (एसपीए) दर्जा मागितला आहे. तसेच मेट्रो मार्गापासून दोन्ही बाजूस ५०० मीटरपर्यंतच्या हद्दीत होणाऱ्या बांधकामाचे अधिकार पीएमआरडीला द्यावेत, अशी मागणी केली आहे. हे अधिकार देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसणार आहे.
तुपे यांनी सांगितले की, महापालिकेच्या हद्दीत विविध मार्गांनी घुसखोरी करण्याचे नियोजन पीएमआरडीएने केले आहे. महापालिका हद्दीस समाविष्ट झालेल्या गावांचा ‘विकास आराखडा’ (डीपी) तयार करण्याची मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा डाव यानिमित्त आखला जात आहे. ज्या भागातून मेट्रो मार्ग जात आहे, तेथील बांधकामाचे अधिकार देण्याची मागणी पीएमआरडीए करते. मात्र तेथील पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन याबाबतची जबाबदारी घेत नाही.

Web Title: BJP's policy of making the beggar of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.