भाजपचे महावितरण विरोधात ‘टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:54+5:302021-02-06T04:19:54+5:30
पुणे : महावितरणाने ७५ लाख वीजग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे, ...
पुणे : महावितरणाने ७५ लाख वीजग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे, असा आरोप करीत शुक्रवारी शहर भाजपच्या वतीने शहरातील विविध महावितरण कार्यालयासमोर ''टाळा ठोको व हल्लाबोल'' आंदोलन करण्यात आले.
कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वाखाली सदाशिव पेठ पेशवे पार्क, महावितरण केंद्रांवर ''टाळा ठोको व हल्लाबोल'' आंदोलन करण्यात आले. तर कोथरूड भाजपच्या वतीने पुनीत जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
महावितरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कसबा मतदारसंघाचे उपाध्यक्ष उमेश चव्हाण, विजय गायकवाड, प्रतिभा ढमाले, भारत जाधव, शैलेश बढाई, सचिन सोळंकी आदी उपस्थित होते.
--------
फोटो मेल केला आहे.