महापालिकेच्या विषय समित्यांवर भाजपचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:12 AM2021-04-08T04:12:06+5:302021-04-08T04:12:06+5:30
पुणे : महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चारही समित्यांवर सत्ताधारी ...
पुणे : महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चारही समित्यांवर सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे़
महापालिकेच्या शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण, विधी तसेच क्रीडा समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक झाली. यात पालिका निवडणुकीपूर्वीचे अखेरचे वर्ष असल्याने सत्ताधारी भाजपने सर्व भागातील सभासदांना प्रतिनिधित्व कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले आहेत. यानुसार शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी आनंद रिठे, उपाध्यक्षपदी उमेश गायकवाड यांची, विधी समिती अध्यक्षपदी बापूराव कर्णे, उपाध्यक्षपदी संदीप जºहाड यांची, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी रुपाली धाडवे, उपाध्यक्षपदी अर्चना मुसळे यांची निवड झाली. तर क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी अजय खेडेकर, उपाध्यक्षपदी ज्योती कळमकर यांची निवड झाली. भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून या निवडणुकीचे कामकाज पाहिले.
निवडणुकीनंतर नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार पालिकेतील पदाधिकाºयांच्या हस्ते केला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नगरसचिव शिवाजी दौंडकर उपस्थित होते.