रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार! तीन इंजेक्शन १ लाखांना विक्री करणार्‍या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 08:52 PM2021-05-02T20:52:35+5:302021-05-02T20:52:42+5:30

खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून केली कारवाई

Black market of remedivir injection! Two arrested for selling three injections for Rs 1 lakh | रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार! तीन इंजेक्शन १ लाखांना विक्री करणार्‍या दोघांना अटक

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार! तीन इंजेक्शन १ लाखांना विक्री करणार्‍या दोघांना अटक

Next
ठळक मुद्देपोलिसांनी खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक म्हणून पाठविले

पुणे: रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या दोघांना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. निखील बाबुराव जाधव (वय २४, रा. आंबेगाव पठार) आणि मयुर विजय चव्हाण (वय २२, रा. वराळे, तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ इंजेक्शन्स, मोबाईल, कार असा सव्वा आठ लाखांचा माल जप्त केला आहे. 

खंडणी विरोधी पथकातील अंमलदार राजेंद्र लांडगे व विवेक जाधव यांना एक महिला तिच्या साथीदारांच्या मदतीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात ३७ हजार रुपयांना विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक म्हणून पाठवले. निखील जाधव आणि मयुर चव्हाण हे तीन इंजेक्शन १ लाख ५ हजार रुपयांना देण्यास तयार झाले. नवले पुलाजवळील स्टोनेक्स गॅलरी शोरुमसमोर ते इंजेक्शन घेऊन आले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना ही ३ इंजेक्शने त्यांच्या महिला साथीदाराने विकण्यासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले.  सहायक पोलिस निरीक्षक संदिप बुवा आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Black market of remedivir injection! Two arrested for selling three injections for Rs 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.