रेशन दुकानातच काळ्याबाजाराने विक्री

By Admin | Published: July 9, 2015 02:21 AM2015-07-09T02:21:14+5:302015-07-09T02:21:14+5:30

सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे रेशनचे धान्य देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये ‘काळ्याबाजारा’ने थेट रॉकेल व धान्याची विक्री सुरू आहे.

Black market sales in ration shop | रेशन दुकानातच काळ्याबाजाराने विक्री

रेशन दुकानातच काळ्याबाजाराने विक्री

googlenewsNext

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे रेशनचे धान्य देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये ‘काळ्याबाजारा’ने थेट रॉकेल व धान्याची विक्री सुरू आहे. दोन व तीन रुपये किलोचे धान्य पाच ते सहा पट किमतीने आणि रॉकेल चार पट किमतीने सर्रास काळ्याबाजाराने विकले जात असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने शहर आणि ग्रामीण भागात केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघडकीस आले.

रेशनवरील धान्याला केवळ गोडावूनमधूनच पाय फुटतात असे नाही, तर प्रत्यक्ष दुकानात गेल्यावरही ते ज्यांचा हक्क आहे, त्या गरजवंतांच्याच हातात पडेल, याची शाश्वती राहिली नसल्याचे यातून दिसून आले आहे.
केंद्र शासनाने ‘अन्नसुरक्षा कायदा’ लागू केल्यानंतर, प्रती व्यक्ती सरासरी तीन ते पाच किलो धान्य दोन आणि तीन रुपये किलो दराने दिले जाणे अपेक्षित आहे; परंतु त्यांना धान्य देण्यास टाळाटाळ करीत काळ्याबाजाराने विक्री करून, जादा नफा मिळविण्याचे प्रकार घडत आहेत. एका बाजूला अन्नधान्य वितरणकडून कारवाई करण्याचा इशारा दिला जात असताना, राजरोसपणे काळाबाजार सुरू असल्याचे चित्र ग्रामीण व शहरी भागात आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीचा (मोका) कायद्या अंतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे; मात्र हे गांभीर्याने घेतला गेलेला नाही, असेच चित्र आहे.

> लोकमतच्या वतीने पुणे शहरात शिवाजीनगर, गोखलेनगर, पर्वती, गंजपेठ, रास्तापेठ भागातील काही रेशनिंग दुकानांमध्ये, तर ग्रामीण भागात खेड, राजगुरुनगर, भोसरी भागातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन रेशनकार्ड नसताना धान्य मिळते का, याची विचारणा केली. त्या वेळी काळ्याबाजाराने जादा भाव देऊन धान्य दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.

>  लोकमत प्रतिनिधी यांनी शहर व जिल्ह्यातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशनिंगच्या धान्याच्या विक्रीची पाहणी केली. रेशनकार्डशिवाय धान्य खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी स्वस्त धान्य दुकानात काळ्याबाजाराने थेट धान्यांची विक्री सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे.

> लोकमत प्रतिनिधी यांनी शहर व जिल्ह्यातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशनिंगच्या धान्याच्या विक्रीची पाहणी केली. रेशनकार्डशिवाय धान्य खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी स्वस्त धान्य दुकानात काळ्याबाजाराने थेट धान्यांची विक्री सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे.

कट्टा सातशे-आठशे रुपयांना...
आम्ही येथे नवीन राहायला आलो... रेशनकार्ड तिकडे गावाकडचे आहे.. इडलीसाठी पाच किलो तांदूळ पाहिजे... हो मिळेल... कसे किलो... पंधरा रुपये... कमी नाही का... नाही पंधरा रुपयांनीच मिळेल.... रेशनिंगचेच आहेत ना...हो.....कट्टा पाहिजे असेल तर... येथे मिळत नाही, पण तालुक्याच्या गोदामाच्या ठिकाणी गेल्यावर तेथे काम करणाऱ्या पोरांना भेटा... मिळेल..सातशे-आठशे रुपयांना....

रॉकेल ६0 रू...काळ्या बाजाराचाच भाव
पुण्यात गोखले नगर परिसर... रेशनिंगचा आधार लिंकचा अर्ज पाहिजे होता... रेशनकार्ड कुठे आहे.. येथे नाही...नवीन काढायचं.... येथे नाही मिळणार.. शिवाजीनगर येथे जा... काही धान्य मिळेल का... नाही.. पण रॉकेल मिळेल... किती पाहिजे... एक लिटर द्या..... साठ रुपये लिटर.... इतके महाग... हो काळ्याबाजाराचा रेट हाच आहे....


गहू १२ व तांदू ( १८ रूपये...)
रेनशिंगच्या धान्याची चौकशी करायला आले... धान्य आले नाही... संप सुरू आहे... नाही माझ्याकडे रेशनकार्ड नाही... आम्ही येथे नवीन आलोय राहिला.... काय पाहिजे.... गहू आणि तांदूळ..... काय भाव... गहू १२ रुपये.. तांदूळ १८ रुपये आणि साखर २६ रुपये... तांदूळ द्या आता एक किलो.... कट्टा पाहिजे असेल तर... संध्याकाळी या... कट्टा पण मिळेल.

Web Title: Black market sales in ration shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.