काळविटांच्या जिवाला अपघाताचा धोका , वाढत्या नागरीकरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:59 PM2018-04-06T18:59:58+5:302018-04-06T18:59:58+5:30

पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३०० च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे.

blackbuck life in dangerzone from road accident , increasing civilization effect | काळविटांच्या जिवाला अपघाताचा धोका , वाढत्या नागरीकरणाचा परिणाम

काळविटांच्या जिवाला अपघाताचा धोका , वाढत्या नागरीकरणाचा परिणाम

googlenewsNext
ठळक मुद्देमागील चार  वर्षात २७ काळवीट मृत्युमुखी वाहनचालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी

पुणे : भरधाव जाणारी वाहने, बेदरकार वाहनचालक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन...एकूणच कायदा-सुव्यवस्थेविषयीचा बेजबाबदारपणा काळविटांच्या जिवाशी खेळत आहे. वन्यजीव विभाग पुणेच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील ४ वर्षांत २७ काळविटे वाहन अपघातात मृत्यमुखी पडली आहेत. 
पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या  नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३००च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे. या दोघांनाही गवताळ प्रदेश आवश्यक आहे. कमी पाण्याची आवश्यकता असल्याने ते सहजासहजी दिसतात. रानटी कुत्री, कोल्हे, लांडगे हे काळविटाचे नैसर्गिक शत्रू. पूर्वी जमिनीची सलगता असल्याने काळविटांचा वावर मोठ्या प्रमाणावर होता. आता तुकड्या-तुकड्यांत जमिनी शेतीसाठी उपयोगात आणल्यानंतर प्राण्यांचा वावर कमी झाला. जिथे माळढोक पक्षी, तिथे काळवीट आढळ्त असल्याची माहिती वनसंरक्षक वानखेडे यांनी दिली. दोघांनाही झुडपे, जंगल, पाणवठ्याची जागा आवडतात. काळविटाला ओरडता येत नसल्याने तो बºयाचदा आपल्यावरील संकटाची सूचना उंच उड्या मारून देतो. यामुळे इतर पक्षी व प्राणी सतर्क होतात. काळविटाला लांबचे दिसत असल्याने तो पळून जाऊन आपले संरक्षण करू शकतो. 
वाढते नागरीकरण, वाहनांची संख्या, बेजबाबदार वाहनचालक, भरधाव वाहने यामुळे काळविटे अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहिल्यास त्यात २०१३-१४ या काळात २, २०१४-१५ मध्ये ६, २०१५-१६मध्ये १५, २०१६-१७ मध्ये ४ काळविटे वाहन अपघातात मृत्युमुखी पडली. राज्यात नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील रेहकुरी, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि नान्नज येथे काळविटे मोठ्या प्रमाणावर आढळतात. ही तिन्ही अभयारण्ये पुणे वन्यजीव विभागांतर्गत येतात. 

................

* वाहनचालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी
उगीचच वेगाने वाहन चालविण्यापेक्षा संतुलित वेगाने वाहन चालविणे गरजेचे आहे. आपल्या चुकीमुळे निष्पाप वन्यप्राणी मरत असतील, तर दोष कुणाचा? प्राण्यांवर विसंबून राहण्यापेक्षा वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवावे. बºयाच अपघातांचे कारण पाहिल्यास ते वाहनांचा वाढता वेग असल्याचे दिसून येईल. 
- रवींद्र वानखेडे (वनसंरक्षक वन्यजीव विभाग, पुणे) 

* कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. नागरिक, वाहनचालक यांनी वन्यजीवांविषयीच्या कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. वन्यजीव  कायद्यातील तरतुदी कठोर असून नागरिकांनी होणाºया शिक्षेचा विचार करावा. नियमांचा आदर राखल्यास निसर्ग, प्राणी आणि आपण यांच्यात संवाद राखण्यास मदत होईल. 
- रंगनाथ नाईकडे (वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, पुणे) 
 

Web Title: blackbuck life in dangerzone from road accident , increasing civilization effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.