Pune Crime: शरीरसंबंधांची माहिती घरी सांगते म्हणत, तरुणाला ब्लॅकमेलिंग; हडपसरमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:10 AM2023-11-06T09:10:50+5:302023-11-06T09:11:30+5:30
हा प्रकार डिसेंबर, २०१९ ते २८ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान हडपसरमध्ये घडला....
पुणे : शारीरिक संबंधांची माहिती घरच्यांना सांगते असे म्हणत, तर कधी गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, एका महिलेने युवकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार डिसेंबर, २०१९ ते २८ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान हडपसरमध्ये घडला. या प्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून ३० वर्षीय महिलेवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी महिलेची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर, महिलेने फिर्यादी यांना वारंवार फोन करून भेटण्यासाठी बोलवून घेतले. फिर्यादी भेटण्यास गेला नाही, तर त्यांच्यातील शारीरिक संबंधांची माहिती त्यांच्या घरच्यांना देईन, अशी धमकी दिली. त्यानंतर, गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत वारंवार पैसे घेतले.
प्रकरण मिटवायचे असेल, तर एकरकमी २० लाख रुपये दे, अशी मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर कायदेशीर कारवाई करून नोकरी घालविण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.