दोष मात्र इंग्रजी माध्यमाला
By admin | Published: November 14, 2014 12:15 AM2014-11-14T00:15:24+5:302014-11-14T00:15:24+5:30
इंग्रजी माध्यमाच्या बोलबालामुळे मराठी भाषेतील बालवा्मयाकडे मुलांचा ओढा कमी झाला आहे; असे चित्र प्रथमदर्शनी जरी दिसत असले तरी वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे.
Next
पुणो : इंग्रजी माध्यमाच्या बोलबालामुळे मराठी भाषेतील बालवा्मयाकडे मुलांचा ओढा कमी झाला आहे; असे चित्र प्रथमदर्शनी जरी दिसत असले तरी वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे. मराठीमध्येच काय पण इतर प्रादेशिक भाषांमध्ये मुलांना वाचनाची गोडी लागावी, अशी रंजक आणि मनोरंजनात्मक पुस्तके निर्मिती होत नसल्याने बालसाहित्याकडे मुले फारशी वळत नसल्याचे समोर आले आहे. दर्जेदार बालसाहित्यकृतींची भारतीय भाषांमध्ये वानवा आहे, पण ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ या उक्तीप्रमाणो दोष मात्र इंग्रजी भाषेतील वाढत्या वचर्स्वाला दिला जात आहे.
साधारणपणो बालसाहित्य हे शिशु, बाल आणि कुमार अशा तीन प्रकारात मोडले जाते, मात्र आपल्याकडे दुर्देवाने ‘बाल’ या भागालाच जास्त महत्व देण्यात आले. त्यामध्येही चरित्रत्मक किंवा बोधपर पुस्तकांचाच अधिकांश समावेश आहे. ईसापनिती, अकबर-बिरबल, पंचतंत्र’ यासारखी पुस्तके म्हणूनच आजही तग धरून आहेत. आणि याच पुस्तकांना आजही मागणी आहे.
लहान मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करणारी, त्यांचे मनोरंजन करणारी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी पुस्तके मुलांसाठी निर्मित होणो आवश्यक आहे, मात्र मराठीमध्ये काहीअंशी अशा पुस्तकांचा अभावच जाणवतो. याऊलट इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये प्रत्येक मुलाला डोळ्यासमोर ठेवून नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून पुस्तकांची निर्मिती होत आहे. मुलांना पहिल्यांदा आकर्षित करते ते चित्र. त्यालाच प्राधान्य देऊन गोष्टीची मांडणी केली जात असल्यामुळे इंग्रजी किंवा हिंदी भाषांमध्ये बालसाहित्याची मोठी बाजारपेठ गेल्या काही वर्षामध्ये प्रस्थापित झाली आहे.
कोणताही बोध किंवा संदेश न देता केवळ आकलन आणि मनोरंजन यानिकषांवर इंग्रजीमध्ये भर दिला जात असल्याने पालकांसह मुलांचीही मागणी याच भाषेतील पुस्तकाला अधिक आहे.
कुमार साहित्य हा देखील असाच दुर्लक्षिलेला भाग आहे. कुमारवयासाठीही साहित्यनिर्मित होण्याची गरज आहे, परंतु ही मानसिकता अजून निर्माण झालेली नाही. मूल सर्वप्रथम शिकते ते आपल्या मातृभाषेमधूनच. आपल्या भाषेमध्येच त्याच्या वाचिक क्षमतेनुसार बालसाहित्याचे लेखन झाले पाहिजे, तसे बालसाहित्यिक निर्माण होणो गरजेचे आहे. मुलांची वैचारिक भूक मातृभाषेमधून भागली जात नसल्यानेच मुलांचा ओढा इंग्रजी साहित्याकडे वाढत चालला आहे, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न बालसाहित्यिक आणि प्रकाशकांनी केला आहे.
मुलांना जे वाचयचं आहे ते आपण त्यांना वाचून दिले पाहिजे. चरित्रत्मक पुस्तके त्यांच्यावर थोपता कामा नयेत. मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि आकलन क्षमतेला वाव देणारे साहित्य निर्माण होणो ही काळाची गरज आहे.
- दत्ता टोळ, बालसाहित्यिक
बालसाहित्यामध्ये मराठी पुस्तकांची संख्या अत्यंत कमी आहे. आजही मराठीतील ईसापनिती, पंचतंत्र, अकबर-बिरबल अशा पुस्तकांनाच मागणी आहे, याऊलट इंग्रजीमधील गोष्टींची पुस्तके खरेदी करण्यावर लहान मुलांसह पालकांचा भर अधिक आहे.
- सुनील मेहता, प्रकाशक
लहान मुलांसाठी लिहिणो ही जाता-येता लिहिण्यासारखी गोष्ट नाही. लहान मुलांसाठी लिहिणो खूप अवघड गोष्ट आहे. त्यांना आवडेल, रूचेल, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण होईल अशी पुस्तके मुलांसाठी निर्मित व्हायला पाहिजेत. मात्र भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अशा पुस्तकांचा काहीसा अभाव जाणवतो.
- संध्या टांकसाळे, संपादिका, प्रथम बुक्स