धायरीत प्रेमभंगातील रागामुळे प्रेयसीच्या घराजवळ स्फोट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:36 PM2018-08-10T16:36:56+5:302018-08-10T16:38:01+5:30

प्रेमभंग झाल्यामुळे युवतीला धडा शिकविण्यासाठी तिच्या घराच्या परिसरात स्फोट घडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

The blast near the house of a girlfriend due to break up | धायरीत प्रेमभंगातील रागामुळे प्रेयसीच्या घराजवळ स्फोट 

धायरीत प्रेमभंगातील रागामुळे प्रेयसीच्या घराजवळ स्फोट 

googlenewsNext
ठळक मुद्देधायरीतील स्फोटाचे गुढ उकलले : दोघा तरुणांना अटक 

पुणे : प्रेमभंग झाल्यामुळे युवतीला धडा शिकविण्यासाठी तिच्या घराच्या परिसरात स्फोट घडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धायरी येथे बुधवारी पहाटे झालेल्या स्फोटप्रकरणी पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे.  या स्फोटाने बुधवारी रात्री संपूर्ण धायरी परिसर हादरला होता. 
किशोर आत्माराम मोडक  (वय २०) आणि अक्षय राजाभाऊ सोमवंशी (वय २४, दोघेही रा. वडकी, १० वा मैल, सासवड रोड, पुणे) या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोरची मावशी धायरी परिसरात राहते. त्याच परिसरात एक तरुणी राहत होती. मावशीकडे नेहमी जाणे-येणे असल्याने किशोरचे या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. सुमारे दोन वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध युवतीने अचानक संपविल्याने किशोर चिडला. प्रेमभंगाच्या रागातून त्याने युवतीला धडा शिकविण्याचे ठरविले.
बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तो मित्रासह मोटारीतून फटाक्याची दारू मोठ्या प्रमाणात एकत्र करून एका काडीपेटीच्या आकाराच्या वस्तूत भरली. तसेच एमसीलमध्ये बॉल बेअरिंग टाकून त्यास वात लावली. या प्रकारे बॉँबसदृश वस्तूचा त्याने स्फोट केला. या प्रकारात घराची खिडकी फुटली होती. 
परिसरात स्फोट झाल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची संपूर्ण पाहणी केली. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. या वेळी पहाटेच्या सुमारास किशोर आणि अक्षय या परिसरात असल्याचे दिसले होते. त्यांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखविल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. 

Web Title: The blast near the house of a girlfriend due to break up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.