आफळेबुवांच्या आठवणींना उजाळा

By admin | Published: February 21, 2017 03:14 AM2017-02-21T03:14:41+5:302017-02-21T03:14:41+5:30

पहाटेचे प्रात:स्मरण, माधुकरी मागून मिळविलेल्या जेवणाचा एकित्रतपणे घेतलेला आस्वाद, संस्कृत स्तोत्रांपासून उदकशांतीसारख्या

Blaze off the memories of Afalebu | आफळेबुवांच्या आठवणींना उजाळा

आफळेबुवांच्या आठवणींना उजाळा

Next

पुणे : पहाटेचे प्रात:स्मरण, माधुकरी मागून मिळविलेल्या जेवणाचा एकित्रतपणे घेतलेला आस्वाद, संस्कृत स्तोत्रांपासून उदकशांतीसारख्या पूजेपर्यंत मिळालेले धडे आणि मल्लखांब, पोहण्यासारख्या व्यायाम करण्याकरिता उद्युक्त केलेल्या गोविंदस्वामी ऊर्फ नानांनी केलेले संस्कार आज आमच्या जडणघडणीत मोलाचे ठरले, असे सांगत नानाविध आठवणींमध्ये व्यास गुरु कुलातील (सध्याचे नारद मंदिर) ५० वर्षांपूर्वीचा शिष्यवर्ग रमला.
निमित्त होते, सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे राष्ट्रीय कीर्तनसम्राट गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त आफळे अकादमीतर्फे व्यास गुरु कुलातील १९५५ ते ६५ मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या संमेलनाचे.
या वेळी सुधाकर थत्ते, वासुदेव आपटे, डॉ. दत्तराजशास्त्री वाडदेकर, डॉ. अरु ण प्रभुणे, सतीश गुर्जर, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, क्रांतिगीता महाबळ, प्राची मोडक, रेवा खडकीकर आणि इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. दत्तराजशास्त्री वाडदेकर म्हणाले, ‘‘आफळेबुवांनी राज्यभर केलेल्या कीर्तनांतून गरीब मुलांचे संगोपन आम्ही करू, असा प्रचार केला. त्यानुसार अनाथ, गरीब मुलांना सदाशिव पेठेतील व्यास गुरु कुलात एकत्र करीत त्यांना शिक्षण दिले. पहाटे ४.३० पासून गुरु कुलातील दिनक्र म सुरु होत असे. माधुकरी मागून जेवण करायचे आणि बाराही महिने थंड पाण्याने अंघोळ करायची, त्यासोबच संध्या आणि स्तोत्रपठण होतेच. त्यामुळे लहानपणापासून आम्हा सर्वच विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार झाले, ते आफळेबुवांमुळेच.
डॉ. अरु ण प्रभुणे म्हणाले, ‘‘आफळे यांनी हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेतले. ते कष्ट गरीब मुलांना सहन करावे लागू नयेत, यासाठी गुरु कुल स्थापन केले. गुरु कुलामध्ये वासंतिक वर्ग होत असत. त्यामध्ये ब्रह्मणस्पतीसूक्त, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, सौरसूक्त, पुरु षसूक्त, उदकशांत यांसारख्या अनेक गोष्टी शिकविल्या जात. त्यासोबतच महाराष्ट्र मंडळात व्यायामाचे धडेही मिळत होते. त्यामुळे एक उत्तम नागरिक घडविण्याकरिता साकारलेल्या गुरु कुलात पुन्हा एकदा एकत्र आल्याचा आम्हाला आनंद आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Blaze off the memories of Afalebu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.