अंध व्यक्तींसाठी डोळस काठी
By admin | Published: April 11, 2016 12:31 AM2016-04-11T00:31:56+5:302016-04-11T00:31:56+5:30
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अंध व मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष उपकरणे बनविली आहेत. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे रोहित सावंत, प्रथमेश जाधव, दीपक सिन्हा
पिंपरी : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अंध व मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष उपकरणे बनविली आहेत.
डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे रोहित सावंत, प्रथमेश जाधव, दीपक सिन्हा , अतिष पुजारी, अवधूत जगदाळे, सृजन भोईर, मोहसीन पटेल या विद्यार्थ्यांनी ही उपकरणे तयार केली आहेत. अंध, मूकबधिर व्यक्तींसाठी चार उपकरणे निर्माण केली आहेत.
अंध व्यक्तींसाठी बनविण्यात आलेल्या काठीला सेन्सर बसविण्यात आले आहेत. हा सेन्सर अंध व्यक्तींच्या समोरील अडथळे शोधतो आणि त्यानुसार ती काठी व्हायब्रेट होते. काठीमुळे अंधांना रस्त्यावर चालणे सुकर होणार आहे. त्यासाठी अल्ट्रासोनिक सेन्सरचा वापर केला आहे. अंध व्यक्तीसमोर खड्डा किंवा पायऱ्या आल्यास ती काठी वेगळ्या तऱ्हेने व्हायब्रेट होते. या काठीच्या साहाय्याने आरएसआरटी तंत्राचा वापर करून घरातील पंखे, टीव्ही सुरू करणे व बंद करणे सहज शक्य होणार आहे. काठीमध्ये असणाऱ्या इन्फ्रारेड सेन्सरच्या साहाय्याने समोर पायऱ्या किंवा खड्डा आहे की नाही, हे सहजरीत्या समजणार आहे. काठीवर दिवा बसविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)मूकबधिर व्यक्तींसाठी वोकलायझेशन डिव्हाइसची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे. हे उपकरण हातातील मनगटावर बांधता येते. त्याद्वारे माहिती मिळणे शक्य होत आहे. या उपकरणातही आरएस आरटी उपकरणाच्या साहाय्याने घरातील विजेवरील उपकरणे सुरू करणे किंवा बंद करणे शक्य होणार आहे. तसेच आवाजाच्या तीव्रतेनुसार पट्ट्याचे व्हायब्रेशन कमी - जास्त होते. त्यामुळे मूकबधिर व्यक्तींना आवाजाचा अंदाज लावणे सहज शक्य होणार आहे.