लोणावळा मार्गावर रविवारी ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 07:00 PM2018-08-11T19:00:33+5:302018-08-11T19:01:32+5:30
मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्वयंचिलत ब्लॉक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी तळेगाव-शेलारवाडी-देहूरोड या स्थानकांदरम्यान लोणावळा मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.
पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्वयंचिलत ब्लॉक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी तळेगाव-शेलारवाडी-देहूरोड या स्थानकांदरम्यान रविवारी (दि. १२) लोणावळा मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे यावेळेत लोणावळालोकल सेवा प्रभावित होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
लोणावळा मार्गावर प्रत्येक एक किलोमीटर दरम्यान सिग्नल उभारला जाणार आहे. या कामांमुळे गाड्यांना होणारा विलंब टाळता येणे शक्य होईल. ब्लॉकमुळे रविवारी पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी ५.४५, ६.३०, दुपारी १२.१५, १ व ३ वाजता सुटणारी लोणावळा लोकल धावणार नाही. तसेच शिवाजीनगर येथून सकाळी ११.२० वाजता सुटणारी लोणावळा लोकल आणि पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी ६.५० व ८.५७ वाजता सुटणारी तळेगाव लोकलही रद्द झाली आहे.
लोणावळा स्थानकातून सकाळी ६.३०, ८.२०, १०.१०, दुपारी २, २.५० व ३.४० वाजता सुटणारी लोकल धावणार नाही. सकाळी ९.५७ ची तळेगाव-शिवाजीनगर व सकाळी ७.५० ची तळेगाव-पुणे लोकलही रद्द करण्यात आली आहे. ब्लॉकच्या कालावधीत पुण्यातून सकाळी ८.०५ व ९.५५ वाजता लोणावळाकडे जाणारी आणि लोणावळा येथून सकाळी ७.२५ व ११.३० सुटणाऱ्या लोकल नियमित धावतील, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.