शहरात ४२ ठिकाणी नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:13 AM2021-02-24T04:13:01+5:302021-02-24T04:13:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी ...

Blockade at 42 places in the city | शहरात ४२ ठिकाणी नाकाबंदी

शहरात ४२ ठिकाणी नाकाबंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शहर पोलीस दलाने ४२ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. रात्री ११ ते पहाटे ६ वाजेदरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर दिवसभर विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरू आहे.

शहरात २८ फेब्रुवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेतील नागरिक व कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे.

संचारबंदीच्या काळात या ४२ नाकाबंदीच्या ठिकाणावर रस्त्यावरून फिरणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. उशिरापर्यंत फिरण्याचे कारण जाणून घेतले जात आहे. कोणत्याही कारणाशिवाय फिरणा-यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस ठाणे व वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात ९०२ विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करुन त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत पुणे शहरात २ लाख २८ हजार ५६० लोकांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११ कोटी ६ लाख ६ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ७९३ नागरिकांवर कारवाई

पुणे जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी विनामास्क फिरणाऱ्यावर ९७३ जणांवर कारवाई करून १ लाख ९७ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे. तर जिल्हा प्रशासनाने ९१३ जणांवर कारवाई करून २ लाख ९८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मावळ तालुक्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Blockade at 42 places in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.