अपहरण करून खून

By admin | Published: March 13, 2016 01:07 AM2016-03-13T01:07:50+5:302016-03-13T01:07:50+5:30

मोशीतून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या प्रथमेश अजिनाथ पगारे (वय १७, रा. लक्ष्मीनगर, मोशी) या तरुणाचा मृतदेह वढू-तुळापूर येथील नदीपात्रात आढळून आला

Blood abduction | अपहरण करून खून

अपहरण करून खून

Next

पिंपरी : मोशीतून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या प्रथमेश अजिनाथ पगारे (वय १७, रा. लक्ष्मीनगर, मोशी) या तरुणाचा मृतदेह वढू-तुळापूर येथील नदीपात्रात आढळून आला.
अपहरण करून डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अजय राठोड (वय १९, रा. नारायणगाव), धीरज बाबूराव कुदळे (वय २०, मोशी, शिवाजीनगर ) या दोन आरोपींना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
प्रथमेश हा मोशीतील लक्ष्मीनगरमध्ये राहत होता. मोशी यात्रेच्या दिवशी रात्री १२च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यास मोबाइलवरून संपर्क साधला. तो घराबाहेर पडला. सकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे याबाबत फिर्याद नोंदवली होती. पोलिसांनी प्रथमेशच्या मोबाइलवर कॉल केलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, शनिवारी पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. (प्रतिनिधी)
आरोपींपैकी अजय राठोडचे चार महिन्यांपूर्वी प्रथमेशबरोबर भांडण झाले होते. प्रथमेशने अजयला मारहाण केली होती. त्यानंतर अजय नारायणगावला निघून गेला होता. काही दिवसांनी तो मामाला घेऊन प्रथमेशकडे झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्यास आला होता. त्या वेळीसुद्धा प्रथमेशने त्याला मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून अजयने धीरज कुदळे या साथीदाराच्या मदतीने अपहरण करून प्रथमेशचा खून केला.

Web Title: Blood abduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.