राजेगावमध्ये ४१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:07+5:302021-05-07T04:12:07+5:30
दौंड तालुका प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्य समाज निर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
दौंड तालुका प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्य समाज निर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ४१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
सदर रक्तदान शिबिरास दौंड येथील रोटरी क्लब रक्तपेढीचे सहकार्य झाले.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुकाध्यक्ष रमेश शितोळे -देशमुख, सरचिटणीस शैलेश शिपलकर, उपाध्यक्ष रफिकभाई सय्यद , चिटणीस डॉ. राहूल शेलार, रामदास फाजगे, युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल दोरगे, कामगार आघाडीचे अध्यक्ष प्रमोद शितोळे, उपाध्यक्ष दत्ता चव्हाण , विद्यार्थी संघटनचे अध्यक्ष सुमित निंबाळकर, रोटरी क्लबचे व्यवस्थापक नारायण पाटील, व्यसन मुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र कदम, निळकंठ खंडागळे , अक्षय नांगरे, सुनिल धुमाळ, संदिप मोरे, दिनेश जगताप, युवराज मोरे, सूरज ढमे उपस्थित होते.
शिवसेनेचे नेते दौंडचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी शिबिरास भेट दिली.
शिबिर यशस्वी होण्यासाठी गुलमोहोर लॉन्सचे योगदान लाभले.
--
०६राजेगाव रक्तदान शिबीर
छायाचित्र- राजेगाव (ता.दौंड) येथील गुलमोहोर लॉन्स येथे दौंड तालुका प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्य समाज निर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.)