पांचाळ सोनार समाजाच्यावतीने रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:58+5:302021-04-30T04:13:58+5:30

या शिबिरामध्ये ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन भारती विद्यापीठ गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता यादव आणि साहित्यिक बबन ...

Blood donation camp on behalf of Panchal Sonar Samaj | पांचाळ सोनार समाजाच्यावतीने रक्तदान शिबिर

पांचाळ सोनार समाजाच्यावतीने रक्तदान शिबिर

Next

या शिबिरामध्ये ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन भारती विद्यापीठ गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता यादव आणि साहित्यिक बबन पोतदार यांचे हस्ते करण्यात आले.

या वेळी कोरोनातून मुक्त झालेल्यांची प्लाझ्मा दानासाठी नोंदणी करण्यात आली, या प्लाझ्मा दात्यांच्या नोंदणीतून गरजवंतांना प्लाझ्मा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि ब्लुटुथ हेडफोन्स देण्यात आले. या वेळी स्थानिक नागरिक, युवक आणि सोनार समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराला सोनार समाजातील गणपत दीक्षित, प्रकाश दीक्षित, चंद्रकांत पंडित, चंद्रकांत दीक्षित, संदीप आटपाळकर, रमेश पंडित, शिवाजी पंडित, सुरेश शेरेकर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक अनिल पाटणकर, आप्पासाहेब परांडे, डॉ. दीप्ती पोतदार, लायन्स क्लबचे आर. सी. लायन रवींद्र गोलार, विठ्ठल वरुडे पाटील आणि ऊर्मिला जाधव उपस्थित होते.

या शिबिरासाठी सोनार समाजाच्या अध्यक्षा रूपाली दीक्षित, उपाध्यक्ष आशिष पंडित, सचिव वंदना पंडित यांचेसह संपूर्ण कार्यकारिणी मंडळाने विशेष प्रयत्न केले.

Web Title: Blood donation camp on behalf of Panchal Sonar Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.