धारिवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:13 AM2021-03-01T04:13:54+5:302021-03-01T04:13:54+5:30
उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. शिरूर येथील उद्योगपती प्रकाशभाऊ ...
उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
शिरूर येथील उद्योगपती प्रकाशभाऊ रसिकलाल धारिवाल मित्र मंडळाच्या वतीने व यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या वेळी युवा उद्योजक आदित्य धारिवाल, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, राम बांगड, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, मनसे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, सागर नरवडे, रक्तदान शिबिराचे आयोजक नगरसेवक अभिजित पाचर्णे, नगरसेवक विठ्ठल पवार, तुकाराम खोले, योगेश जामदार, शारदा भुजबळ,विशाल जोगदंड,चंदना गायकवाड, मितेश गादिया, दादाभाऊ लोखंडे व नगर सेवक नगरसेविका व शहरातील नागरिक उपस्थित होते.
या वेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण म्हणाले, की उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांचे देशात, राज्यात व शहरात मोठे योगदान असून, अनेक गोरगरीब पीडित नागरिकांना त्यांनी नियमित मदत केली आहे. सामाजिक धार्मिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे व त्यांच्या दानशूरपणामुळे त्यांना भामाशा म्हणून समाजाकडून पदवी देण्यात आली आहे. त्यांची स्मृती सतत शिरूर शहरातील नागरिकांमध्ये राहावी यासाठी हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे रक्तदान शिबिराचे तिसरे वर्ष आहे.