जैन सोशल ग्रुपकडून रक्तदान शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:30+5:302021-04-15T04:09:30+5:30
जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या वतीने स्व. शरदभाई शहा यांच्या स्मरणार्थ “बादशहा”या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महावीर प्रतिष्ठान ...
जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या वतीने स्व. शरदभाई शहा यांच्या स्मरणार्थ “बादशहा”या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महावीर प्रतिष्ठान सॅलसबरी पार्क,लेक टाऊन स्थानक,व गंगाधाम सोसायटी अशा तीन ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले.
याप्रसंगी आयोजक विभागिय समन्वय युवराज शहा, तिमिर संघवी, सुजस शहा, स्मिताबेन शरद शहा, बिरेन शहा, राजीव शहा, रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड, नगरसेवक प्रवीण चोरबेले, हरेशभाई शहा, अभय छाजेड आदी उपस्थित होते. यावेळी जैन साध्वी हिमानी महाराज यांनीही रक्तदान केले.
याप्रसंगी बोलताना युवराज शहा यांनी उपक्रमात सहभागी सर्वांचे आभार मानले. राम बांगड यांनी आजच्या कोरोना महामारीच्या काळातील रक्ताचा तुटवडा चिंताजनक असून अशा रक्तदान शिबिरातून नागरिकांचे प्राण वाचविण्यात मोलाचे सहाय्य होत आहे असे संगितले. या शिबिरात १६० पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले. घोलप ब्लड बँक व सहायता ग्रुप यांनी तांत्रिक संचालन केले.
छायाचित्र : जैन साध्वी हिमानी महाराज रक्तदान करताना