रक्तदान शिबिर, ज्येष्ठांसाठी शोभाई मोफत दवाखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:11 AM2021-02-08T04:11:12+5:302021-02-08T04:11:12+5:30
सामाजिक कार्यकर्ता तथा परिवर्तन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा लगड यांनी कोरोना काळात ज्या-ज्या समाजसेवकांनी योगदान दिले. उल्लेखनीय कामगीरी केली ...
सामाजिक कार्यकर्ता तथा परिवर्तन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा लगड यांनी कोरोना काळात ज्या-ज्या समाजसेवकांनी योगदान दिले. उल्लेखनीय कामगीरी केली अशा कोविड योद्ध्यांचा व समाजोसेवकांचा सन्मान संध्या टिळेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून केला. यावेळी पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, जनसेवा सहकारी बँक संचालक रवी तुपे, भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, कॅन्टोन्मेंटचे भाजप अध्यक्ष महेश पुंडे, हडपसर भाजप ओबीसी अध्यक्ष संजय सातव, माजी नगरसेविका विजया वाडकर, गणेश घुले, हणुमंत घुले, रामभाऊ कर्वे,किशोर कांबळे, संजय भुजबळ,बापू मिरेकर, स्वाती कुरणे, स्मिता गायकवाड, दीपक भोसले, प्रमोद सातव, परेश सातव, अनिल लगड, रोहिदास लगड, एेश्वर्या लगड, महेश टेळे पाटील, संदीप राऊत उपस्थित होते.
पूना ब्लड बँक, मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान, शोभाई अनाथालय, परिवर्तन शिक्षण संस्था, परिवर्तन महिला आधार केंद्र, श्री राममंदिर ट्रस्ट आदींनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
फोटो : हडपसरमधील श्रीराम चौकात परिवर्तन महिला आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्ष शोभा लगड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी शोभाई मोफत दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले.