राजगुरूनगर एसटी स्टँड येथे रविवारी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:43+5:302021-07-17T04:09:43+5:30
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कान्हेवाडी येथील शंकर मठाचे १०८ यती परमेश्वर महाराज, ॲड. नीलेश बाळासाहेब आंधळे, बजरंग दलाचे गोरक्षा प्रमुख ...
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कान्हेवाडी येथील शंकर मठाचे १०८ यती परमेश्वर महाराज, ॲड. नीलेश बाळासाहेब आंधळे, बजरंग दलाचे गोरक्षा प्रमुख गणेश रौधळ, मंचर शहर संयोजक अक्षय जगदाळे, सह्यादी प्रतिष्ठानचे बाबासाहेब दिघे, हुतात्मा राजगुरू फाउंडेशनचे अमर टाटिया हे उपस्थित राहणार आहेत. हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी बजरंग दलाचे मयूर सावंत, अक्षय पऱ्हाड, राजेश लांडे, अवधूत चौधरी, दीपक गावडे, निकेत आरबूज, दत्ता पोखरकर, योगीराज करवंदे, कृष्णा कुलकर्णी, मयूर भगत, चेतन हाडके हे विशेष प्रयत्न करत आहेत. या रक्तदान शिबिरासाठी पुणे ब्लड बँक त्यांच्या अधिकारी-सहकारी वृंद उपस्थित राहणार आहेत.
राजगुरूनगरमधील ग्रामस्थांनी रक्तदानासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन ॲड. नीलेश आंधळे यांनी केले आहे.
--
अधिक माहितीसाठी राजेंद्र मांजरे- ९८२२०८८६२५ व ॲड. नीलेश आंधळे ७५८८०७९०६५ यांच्याशी संपर्क साधावा.