सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देत रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:46+5:302021-04-14T04:10:46+5:30

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ मित्र मंडळाने सर्व कार्यक्रम रद्द करून रक्तदान शिबिराचा अभिनव उपक्रम राबवला. या रक्तदान शिबिरात ...

Blood donation camps splitting public events | सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देत रक्तदान शिबिर

सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देत रक्तदान शिबिर

Next

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ मित्र मंडळाने सर्व कार्यक्रम रद्द करून रक्तदान शिबिराचा अभिनव उपक्रम राबवला. या रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

सामाजिक अंतर राखून तसेच सॅनिटायझरचा योग्य पध्दतीने वापर करून शिस्तबद्ध पद्धतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नगरसेवक अविनाश साळवे, शैलेश राजगुरू, नितीन राजगुरू, भूषण जाधव, अजय जानराव, विकास भिंगारदिवे, उद्योजक साईराम सातव आदी मान्यवर उपस्थित होते. ससून रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. प्रियांका कदम, समाजसेवा अधीक्षक अरुण बर्डे, डॉ. शुभांगी रत्नावत, डॉ. अनुजा मुल, तंत्रज्ञ श्यामसुंदर चाटे, स्टाफ नर्स आशा वाघ, सहायक संभाजी शिंदे,मरिअप्पा देवर तसेच सिद्धार्थ मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. ससून रक्तपेढीच्या डॉक्टर, तंत्रज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी यांचा यावेळी सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. ------------------

फोटो ओळ - सिद्धार्थ मित्र मंडळ येरवडा गावठाण यांच्या वतीने महामानव विधायक जयंती महोत्सवअंतर्गत ससून रक्तपेढीच्या रक्त संक्रमण अधिकारी, डॉक्टर तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष गौरव करण्यात आला.

Web Title: Blood donation camps splitting public events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.