कोरोना लसीकरणानंतर १४ दिवसांनी करता येईल रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:33+5:302021-05-06T04:11:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लसीकरण केल्यानंतर रक्तदान करण्याची मुदत आता २८ दिवसांहून १४ दिवसांवर आणण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लसीकरण केल्यानंतर रक्तदान करण्याची मुदत आता २८ दिवसांहून १४ दिवसांवर आणण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण झाल्यानंतर, रक्तदानात घट होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सहायक संचालक डॉ. सुनील गुप्ता यांनी याबाबत सर्व राज्यांच्या आरोग्य विभागाला लिहिले आहे. हा निर्णय घेताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला असल्याचे त्यात नमूद केले आहे. कोरोना लस घेतल्यानंतर रक्तदान करायचे असेल, तर त्यासाठी याआधी २८ दिवसांची मुदत जाहीर केली होती. ती आता १४ दिवस झाली आहे. लस घेतल्यानंतर आता १४ दिवसांनी रक्तदान करता येईल.
वय वर्षे १८ ते ४५ या गटातील लोकसंख्येचे प्रमाण फार मोठे आहे. त्यांचे लसीकरण झाल्यावर थेट २८ दिवसांनी रक्तदान करायचे असेल तर देशात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्र्यांचे म्हणणे आहे.
असा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी या वयोगटाला लस घेण्याआधी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळून मोठ्या शहरांमध्ये रक्तसाठा निर्माण झाला, मात्र तरीही रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून मुदत कमी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.