रक्तदान ही काळाची गरज : पाचुंदकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:15 AM2021-02-21T04:15:44+5:302021-02-21T04:15:44+5:30

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रांजणगाव गणपती (ता. शिरूर)येथे मानसिंगभैया पाचुंदकर युवा प्रतिष्ठान व स्व. दत्ता शेळके युवा ...

Blood donation is the need of the hour: Pachundkar | रक्तदान ही काळाची गरज : पाचुंदकर

रक्तदान ही काळाची गरज : पाचुंदकर

Next

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रांजणगाव गणपती (ता. शिरूर)येथे मानसिंगभैया पाचुंदकर युवा प्रतिष्ठान व स्व. दत्ता शेळके युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मानसिंग पांचुदकर यांनी स्वतः प्रथम रक्तदान करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.पुणे येथील राकेश जैन मेमोरियल रक्तपेढीच्या पथकाने रक्तदान संकलन केले. यावेळी माजी उपसरपंच नवनाथ लांडे, माजी ग्रा. प.सदस्य दादाभाऊ शेळके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश धुमाळ, प्रथमेश शेळके, ऋषीकेश शेळके, विकास शेळके, माऊली लांडे, अक्षय हगवणे तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ९० जणांनी रक्तदानाचे पवित्र काम केले.

रांजणगाव गणपती येथे मानसिंग पाचुंकर यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.

Web Title: Blood donation is the need of the hour: Pachundkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.