मांडवगण फराटामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:28+5:302021-08-21T04:14:28+5:30
शिबिरात १७१ जणांनी रक्तदान करुन चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल शंभूराजे प्रतिष्ठान या सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले. या शिबिरामध्ये ...
शिबिरात १७१ जणांनी रक्तदान करुन चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल शंभूराजे प्रतिष्ठान या सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले. या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांनीदेखील रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या वेळी रक्तदात्यांसाठी पाच वर्षांच्या अपघाती विमा संरक्षण भेट देण्यात आले. या वेळी एआरव्ही स्कीन केअर रुग्णालयाच्या वतीने नागरिकांच्या त्वचेची मोफत तपासणी करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ नेते प्रदीपदादा कंद, शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके, लक्ष्मण बापू फराटे, माणिकआण्णा फराटे,माऊली मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी फराटे, संभाजी फराटे, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गदादे, काकासाहेब खळदकर, काकासो फराटे, वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार, आप्पा कोळपे, वीरेंद्र शेलार, डॉ.मनोज भोसले, ग्रामपंचायत सदस्य सागर फराटे, वैभव फराटे, गणेश फराटे, हनुमंत पंडित, यांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आकाश सूर्यवंशी, ऋषी सकुंडे, दत्ता गायकवाड, सागर फराटे, अमित हांडे, समीर पवार, विकास फराटे, प्रशांत नागवडे, अभिजित फराटे, मनोहर फराटे, संदीप जगदाळे, योगेश फराटे यांनी प्रयत्न केले.