आंबेगाव, जुन्नर, शिरुर मध्ये एका दिवसात हजार लोकांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:26+5:302021-07-22T04:08:26+5:30
-------- मंचर : दैनिक लोकमत व धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले प्रतिष्ठान मंचर यांच्या वतीने आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तीन ...
--------
मंचर : दैनिक लोकमत व धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले प्रतिष्ठान मंचर यांच्या वतीने आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तीन तालुक्यात आयोजित महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आठ रक्तदान केंद्रावर तब्बल १०२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून एका दिवसात रक्त संकलन होण्याचा हा एक विक्रम आहे.
दैनिक लोकमतच्या वतीने रक्तदान महायज्ञ सुरू आहे. लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेअंतर्गत दैनिक लोकमत व धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त एकूण आठ ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. मंचर येथील रक्तदान रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होते.
उपजिल्हा रुग्णालयात सकाळी धर्मवीर चंद्रशेखर बाणखेले यांच्या मातोश्री कल्पनाताई बाणखेले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अंकित जाधव,भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, मंचरचे उपसरपंच युवराज बाणखेले, संदीप बाणखेले, रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण चिखले,अजय आवटे,दत्ताशेठ थोरात,आशिष पुगलिया, सचिन काजळे, ह.भ.प. संतोष महाराज बडेकर,बाळासो पोखरकर गणेश खानदेशे,राहुल पडवळ, बाजीराव मोरडे, बाळासाहेब कानडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले प्रतिष्ठानचे संस्थापक सुहास बाणखेले यांनी आंबेगाव तालुक्यात सुरू झालेल्या रक्तदान चळवळीचा आढावा घेतला. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा)बाणखेले यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय होते. त्यांनी युवकांचे जाळे तयार केले. तालुक्यात रक्तदान शिबिराची सुरुवात त्यांनी केली. रक्तदान शिबिराच्या निमित्ताने सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रित येऊन काम करत असून ही कौतुकास्पद बाब आहे. जयसिंग एरंडे म्हणाले दैनिक लोकमत व धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून महारक्तदान शिबिराचा चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. कोरोना काळात रक्ताची गरज वाढली असून शिबिराचा फायदा सर्वांनाच होईल.
दरम्यान महारक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी एक उच्चांक केला आहे.
धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले प्रतिष्ठानचे संस्थापक सुहास बाणखेले, विलास शेटे, कांताराम भवारी,नवनाथ थोरात, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष मोरडे, बाबू बोराडे, मेहुल भंडारी,किरण गोत्राल,अजित जाधव,अक्षय वाघ, डॉ. राम पोखरकर,राहुल सोदक,बाल्या वळसे, मंगेश वळसे, शेखर खालकर,राजेश जाधव, राहुल रासने, सागर नानावटी, अभिषेक बाणखेले, अक्षय थोरात, प्रतीक बनबेरु,सोनू शिंदे,सुरेंद्र बागल, प्रणील नाकील, बंटी शिरसागर, सौरभ मेहेर,आदित्य नाकील,आदित्य बाणखेले,ऋषिकेश बाणखेले, संदीप मोरडे, प्रद्युम्न हुले, परेश खुडे, दत्ता गांजाळे, राहुल थोरात, माऊली लोखंडे, संदीप दैने,सम्राट बाणखेले, अक्षय राजगुरू,शुभम हुले, सचिन चिंचपुरे, सतीश बढे यांनी नियोजन पाहिले.पुणे ब्लड बँक राहुल सैदाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संकलन केले.निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.
--
चौकट -१
उपजिल्हा रुग्णालयात ४४१ जणांचे रक्तदान
उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे तब्बल ४४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत नाव नोंदणीसाठी गर्दी झाली होती. विशेषता तरुणांनी मोठ्या संख्येने येत रक्तदान केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे शिवशंकर स्वामी, रामदास वळसे पाटील,पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर,सरपंच किरण राजगुरू, डॉ. मंगेश बाणखेले, वसंतराव बाणखेले, लक्ष्मण थोरात, प्रशांत बागल, रविकिरण डोंगरे, सुरेश निघोट, जगदीश घिसे, उद्योजक अशोकराव बाजारे,बाजीराव महाराज बांगर,डॉ. सदानंद राऊत,डॉ. दत्ता चासकर, डॉ. अंबादास देवमाने यांनी भेट दिली.तालुक्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी भेट देऊन महारक्तदान शिबिराचे कौतुक केले.विशेषता पठारे यांनी स्वतः रक्तदान केले आहे.
--
चौकट -२
निमगाव सावात ३२५ जणांचे रक्तदान
निमगाव सावा येथील रक्तदान केंद्रावर चांगला प्रतिसाद मिळाला. तेथे ३२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रांजणी येथे 57, कुरवंडी येथे 56, जुन्नर येथे 50, निरगुडसर येथे ४६ , टाकळी हाजी येथे २६, पिंपरखेड येथे २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.यावेळी रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू तसेच प्रमाणपत्र देण्यात आले.
--
चौकट -३
महिलांचा पुढाकार
रक्तदान शिबिरात तरुणांचा उत्साह दांडगा होता.प्रत्येक जण रक्तदान करून एका विधायक उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करत होता. रक्तदानाच्या बाबतीत महिलाही मागे नव्हत्या. अनेक महिलांनी येऊन रक्तदान केले. मनाली अशोक क्षीरसागर या तरुणीने रक्तदान केल्यानंतर खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली. इनरव्हील क्लब मंचरच्या सर्व सदस्य उपस्थित होत्या. त्यांनी रक्तदात्यांना तुळशीचे रोप व चिक्कीचे वाटप केले. महारक्तदान शिबिराला रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
--
चौकट ४
रक्तदानामुळे मिळाले वारीचे पुण्य
सोमवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र मंगळवारी दिवसभर वरुणराजाने विश्रांती घेतली. त्यामुळे बाहेर गावातील अनेक तरुण दुचाकीवरून रक्तदान करण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे रक्तदान संपल्यानंतर पुन्हा वरुणराजाचे आगमन झाले. त्यावेळी आजच्या रक्तदान शिबिराला निसर्गाने साथ दिल्याची चर्चा रंगली. राजेंद्र खंडू बांगर हे खडकी येथील रक्तदाते रक्तदान करून तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शन बंद असल्याने मंचर येथे रक्तदान करून मला वारीचे पुण्य मिळाल्याची प्रतिक्रिया बांगर यांनी दिली.
--
फोटो क्रमांक : २१ मंचर ब्लडडोनेशन -१
फोटो क्रमांक : २१ मंचर ब्लडडोनेशन -२
फोटो क्रमांक : २१ मंचर ब्लडडोनेशन -३
फोटो क्रमांक : २१ मंचर ब्लडडोनेशन -४