रंगावलीतून रक्तदान अन् सामाजिक एकतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:17+5:302020-12-14T04:27:17+5:30
पुणे : रक्ताला कोणत्याही धर्म-पंथाच्या सीमा नसतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या बंधू-भगिनींसाठी रक्तदान केले पाहिजे. धर्म कोणताही असो, ...
पुणे : रक्ताला कोणत्याही धर्म-पंथाच्या सीमा नसतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या बंधू-भगिनींसाठी रक्तदान केले पाहिजे. धर्म कोणताही असो, रक्ताचे नाते एकच आहे, असा संदेश १० बाय १५ फूट आकारातील रंगावलीतून देत सामाजिक एकता व रक्तदानाचे आवाहन करण्यात आले.
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे रक्तदानाबाबत जनजागृती करण्याकरीता नाना पेठेतील क्षत्रिय किराड धर्मशाळा शितळादेवी मंदिर येथे ही रंगावली साकारण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार, शेखर पवार, रितेश पवार, उमेश वैद्य, राजेश पवार, अॅड.राहुल पवार, गजानन पवार, विजय पवार, श्रीकांत पवार, सुनील पवार, सतिश पवार, विकास पवार, सिद्धांत नातू, सुजित पवार आदी उपस्थित होते. रंगावलीकार सुनील सोनटक्के व वैशाली सोनटक्के यांनी ही रंगावली साकारली.
सागर पवार म्हणाले, ''''''''देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्याचे देणे लागतो, हे कोणीही विसरता कामा नये. महाराष्ट्रामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा असून एक दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी धर्म-पंथ भेद विसरुन समाजाचे देणे देण्यासाठी उभे राहण्याची आवश्यकता आहे.'''''''' ओम रक्तपेढी, मंगळवार पेठ यांच्या सहकार्याने यावेळी रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ८० जणांनी रक्तदान केले.