लोंढे टोळीतील गुंड शेख याचा निर्घृण खून

By admin | Published: August 1, 2015 04:30 AM2015-08-01T04:30:25+5:302015-08-01T04:30:25+5:30

कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्यानंतर त्या टोळीतील त्याचा खास साथीदार अल्ताफ ऊर्फ अब्दुल जब्बार शेख (वय ५०, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन,ता हवेली) याचाही कदमवाकवस्ती ग्रामपंचायत

The blood of the gang gang goose Shaikh | लोंढे टोळीतील गुंड शेख याचा निर्घृण खून

लोंढे टोळीतील गुंड शेख याचा निर्घृण खून

Next

लोणी काळभोर : कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्यानंतर त्या टोळीतील त्याचा खास साथीदार अल्ताफ ऊर्फ अब्दुल जब्बार शेख (वय ५०, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन,ता हवेली) याचाही कदमवाकवस्ती ग्रामपंचायत आवारात निर्घृण खून करण्यात आला. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार केले असून, हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
शेख याचा मुलगा अस्लम अल्ताफ शेख याने फिर्याद दिली असून, त्यामध्ये अप्पा लोंढे याच्या विरोधातील ८ ते १० जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर गुरुवारी अल्ताफ हा येरवडा (पुणे) येथील सादलबाबा दर्गा येथे दर्शनासाठी जात असे. नेहमीप्रमाणे गुरुवारी (दि. ३० जुलै) तो एकटा आपल्या मालकीच्या कारमधून (एमएच ०४-एडब्ल्यू ७५९१) सकाळी अकराच्या दर्शनासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला. सायंकाळपर्यंत घरी पोहोचला नाही. रात्री १०.१५च्या सुमारास पत्नीशी संपर्क झाला. तासाभरात घरी पोहोचतो, असे सांगून मोबाईल बंद केला. मध्यरात्री संपर्क साधला; परंतु मोबाईल बंद होता. आज सकाळी मुलगा अस्लम लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आले, त्या वेळी त्यांना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातील सभामंडपाच्या जवळ एक अनोळखी मृदेह सापडल्याचे सांगण्यात आले. दोघांनी तेथे जाऊन पाहिले असता तो अल्ताफ शेख यांचा होता.
मुलगा अस्लम शेख याने दिलेल्या फिर्यादीमध्ये अप्पा लोंढे याच्याविरोधी टोळीतील गोरख कानकाटे व त्याचे पुतणे मंगेश कानकाटे, अक्षय कानकाटे व अमोल कानकाटे (सर्व रा. कानकाटेवस्ती, उरुळी कांचन), अप्पा कुंजीर (वळती) व शक्ती बडेकर (उरुळी कांचन) व इतर जण त्याच्यावर चिडून होते. तसेच, १२ जून २०११ रोजी डाळिंब (ता. दौड) येथील चंद्रकात दत्तात्रय म्हस्के, शेखर म्हस्के,तुषार म्हस्के यानी उरुळी कांचन येथील हॉटेल ग्रीनपार्क येथे भांडण केल्याने तेसुद्धा चिडून होते, असे नमूद केले आहे. घटनास्थळावर पोलिसांना मद्याच्या बाटल्या सापडल्या असून, तेथे चिखलात झटापट झालेल्या खुणा आढळल्या आहेत. अल्ताफ शेख याचे डोके, तोंड व मानेवर सुमारे २० ते २५ वार करण्यात आले असल्याने तेथे रक्ताचे थारोळे साचले होते. नजीकच्या भिंतीवर सुमारे १५ फुटांपर्यंत रक्ताचे शिंतोडे उडालेले दिसत होते. / आणखी वृत्त ८

अल्ताफ शेख हा जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होता. सहा वर्षांपूर्वी तो लोंढे गँॅगमध्ये सामील झाला होता. त्या वेळी लोंढे याने परिसरातील अनेक लोकांच्या जमिनी दबाव आणून, मारहाण करून व जिवे मारण्याची धमकी देऊन बळकावल्या होत्या. त्या वेळी लोंढेसमवेत अनेक गुन्ह्यांमध्ये शेख यालाही अटक करण्यात आली होती. त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाईसुद्धा करण्यात आली होती.

Web Title: The blood of the gang gang goose Shaikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.