बारामतीत रक्ताचा तुटवडा,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:07+5:302021-03-07T04:10:07+5:30
बारामती : बारामतीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले असल्याचे येथील माणिकबाई चंदुलाल सराफ ...
बारामती : बारामतीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले असल्याचे येथील माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून मत व्यक्त केले आहे.
रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते. मात्र नागरिकांनी कोरोनाची भीती मनात बाळगल्याने रक्त संकलन करण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, रक्त संकलन होत नसल्याकारणाने बारामतीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे. सध्या बारामती परिसरातील रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्या रुग्णांसाठी लागणाऱ्या प्लेटलेटसचा देखील मोठ्या प्रमाणात रुग्णांसाठी मागणी आहे मात्र रक्ताचा तुटवडा असल्याने, ब्लड बँकेत सध्या प्लेटलेट उपलब्ध नाहीत रक्तदान झाल्यास त्या गरजू रुग्णांना तत्काळ उपलब्ध करून देता येतील. इच्छुक रक्तदात्यांनी आणि शिबिर आयोजकांनी येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीत जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांना संपर्क करून रक्तदान करावे जेणे करून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे सोपे होईल, असेही आवाहन डॉ. दोशी यांनी केले आहे.