जमिनीच्या वादातून तरुणाचा खून
By admin | Published: June 17, 2016 05:05 AM2016-06-17T05:05:34+5:302016-06-17T05:05:34+5:30
जमीनीच्या वदातून भूकुम -आंग्रेवाडी (ता.मुळशी) येथे एकाचा खून झाला. दिलीप मारुती चोंदे (वय २५,रा. माताळवाडी -भूगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे.
पौड : जमीनीच्या वदातून भूकुम -आंग्रेवाडी (ता.मुळशी) येथे एकाचा खून झाला. दिलीप मारुती चोंदे (वय २५,रा. माताळवाडी -भूगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे.
मयत दिलीप याचा भाऊ कैलास मारुती चोंदे यांनी फिर्याद दिली आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप याचा खून त्याच्याच मामाचा मुलगा आरोपी बाळू तुकाराम आंग्रे व त्याचे अन्य साथीदार यांनी केला असल्याचा संशय आहे. आरोपी व त्याचे कुटुंबीय हे मयत दिलीप याच्या आईला आपल्या भावाच्या जमिनीतील वारसा हक्क सोडण्यासाठी सतत दबाव टाकत होते. त्या वादातूनच हा खून झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पौड पोलीसानी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे हे करत आहेत. मुळशीत जमिनीला आलेल्या सोन्याचे भाव व त्यातून निर्माण झालेला बहीण^-भाऊ नात्यातील तणाव समोर येत आहे. या तरुणाचा खूनामुळे नातेसंबध बिघडत चालल्याचे अधोरेखित झाले आहे. (वार्ताहर)