BMC Election 2017 - एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला आघाडी, मात्र बहुमतापासून दूरच

By admin | Published: February 21, 2017 07:04 PM2017-02-21T19:04:56+5:302017-02-21T19:35:49+5:30

इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना 86 ते 92 जागा मिळवून नंबर वनचा पक्ष बनणार आहे

BMC Election 2017 - Shivsena lead in exit poll, but far away from the majority | BMC Election 2017 - एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला आघाडी, मात्र बहुमतापासून दूरच

BMC Election 2017 - एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला आघाडी, मात्र बहुमतापासून दूरच

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - राज्यभरातील महापालिकांसाठी आज मतदान पार पडलं आहे. राजकीय पक्षांचं भवितव्य मतपेटीत कैद झालं असलं तरी इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना 86 ते 92 जागा मिळवून नंबर वनचा पक्ष बनणार आहे, तर त्यापाठोपाठ भाजपाला 80 ते 88 जागा मिळण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला 30 ते 34 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर मनसेला अवघ्या 5 ते 7 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, मुंबई महापालिकेतील सत्तेसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे.

(मुंबई  महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)

मनसेच्या पदरात गेल्या वेळेपेक्षा फार कमी यश पडणार आहे. एक्झिट पोलमधून मुंबईत राज ठाकरेंचा करिष्मा ओसरल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे 23 तारखेलाच खरं चित्र स्पष्ट होणार आहे. 

पुण्यात भाजपाला स्पष्ट बहुमत

काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात यंदा कमळ फुलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपाला पुण्यात 77 ते 85 जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला 60 ते 66 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. शिवसेनेची घोडदौड फक्त 10 ते 13 जागांवर राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला सत्ता सोडावी लागण्याचा अंदाज असून, भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. 
(पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: PMC Election 2017)

Web Title: BMC Election 2017 - Shivsena lead in exit poll, but far away from the majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.