‘माळेगाव’च्या संचालक मंडळाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:57+5:302021-09-09T04:13:57+5:30
माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने अंतिम ऊसदर २७५० रुपये जाहीर करताच शेतकरी सभासदांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली दिसत आहे. ...
माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने अंतिम ऊसदर २७५० रुपये जाहीर करताच शेतकरी सभासदांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली दिसत आहे. अंतिम ऊसदर जाहीर होताच कारखाना कार्यक्षेत्रामधील महत्त्वाचा गट असणाऱ्या नीरावागज गावामध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाचा जाहीर निषेध करण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संपततात्या देवकाते, कारखान्याचे माजी संचालक राजेश देवकाते तसेच शेतकरी सभासदांच्या हातामध्ये निषेधाचे फलक उंचावत दिलेल्या कमी ऊसदराचा जाहीर निषेध केला. आज दिवसभर सोशल मीडियावरती फिरत असलेल्या संदेशाची चर्चा माळेगाव कारखाना परिसर व कार्यक्षेत्रात रंगलेली पाहायला मिळाली. माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना व छत्रपती कारखाना वरील तिन्ही साखर कारखाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात तरीपण अंतिम ऊसदर देताना दुजाभाव का? याची चर्चा शेतकरी सभासदांमध्ये रंगलेली आहे.
दिलेला अंतिम ऊसदर हा तुटपुंजा आहे. संचालक मंडळानी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, मिळणाºया रकमेत दिवाळी नव्हे. तर शिमगा सुद्धा साजरा होऊ शकत नाही, यंदाची दिवाळी कडू होणार असल्याने संचालकांच्या नावाने शेतकऱ्यांना बोंबाबोंब आंदोलन करावे लागेल.
—राजेश देवकाते, माजी संचालक माळेगाव साखर कारखाना
माळेगांव कारखान्याने अंतिम ऊसदर कमी दिल्याने शेतकरी सभासदांनी या निर्णयाचा हाती फलक घेत निषेध केला.
०८०९२०२१ बारामती—०३