बोटी पळवल्या... वाळूही केली गायब
By admin | Published: October 12, 2016 02:39 AM2016-10-12T02:39:21+5:302016-10-12T02:39:21+5:30
पुणे जिल्ह्यात चोरट्या वाळूवाहतुकीचा बाजार मांडलेल्या वाळुमाफियांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. पाटस : पाटस (ता. दौंड) येथील ग्रामपंचायती
पाटस/देऊळगावराजे : पुणे जिल्ह्यात चोरट्या वाळूवाहतुकीचा बाजार मांडलेल्या वाळुमाफियांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. पाटस : पाटस (ता. दौंड) येथील ग्रामपंचायती समोरील वाळूचे ढिगारे रात्रीतून अचानकपणे गायब झाले. तर देऊळगावराजे येथे पकडलेल्या बोटीही शिताफीने त्यांनी गायब केल्या आहेत.
पाटसमध्ये चौकशीचे आदेश देण्यापलीकडे प्रशासनाच्या हातात मात्र काही राहिलेले नाही. तर देऊळगावराजे येथे महसुल वनविभाच्या कर्मचारी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करीत आहे.
पाटसच्या संदर्भात मंडल अधिकारी, तलाठी यांना चौकशीच्या सूचना दिल्या असून, वाळू गायब प्रकरणात ज्या कोणाचा हात असले त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी पाटस ग्रामपंचायती समोर वाळूचे ढिगारे साचले होते. हे वाळूचे ढिगारे कोणी जमा केले, याचा थांग पत्ता नाही; मात्र मध्यरात्रीच्या सुमाराला हे ढिगारे गायब झाले आहे. एकंदरीतच ढिगारे गायब केले कोणी, याबाबत ग्रामस्थांत चर्चा सुरू आहे. पाटस ग्रामपंचायत हद्दीतून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घातल्याचा ठराव झाला आहे. कारण, बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या आवजड वाहनांमुळे रस्ते खराब होण्याचे प्रकार सुरू झाले असल्याने ग्रामसभेत वाळू वाहतुकीच्या बंदीचा ठराव झाल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.
पेडगाव येथे वन विभागाच्या हद्दीतील यांत्रिक बोटीवर दौंडचे तहसीलदार विवेक साळुंके यांनी कारवाई केली. त्यांच्या पथकांनी या बोटींना जलसमाधीही दिली. याच दिवशी पेडगाव साखरी पुनर्वसन येथेही या पथकाने बोटी पकडल्या. त्यानंतर पंचनामे करून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटी कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात दिल्या. मात्र, बोटीच्या बंदोबस्तासाठी अधिकारी नसल्याचा फायदा घेत वाळूमाफियांनी या बोटीने के्रनच्या साह्याने ट्रकमध्ये टाकून पळवल्या.
पेडगाव (ता. दौंड) येथे बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या यांत्रिक बोटीवर दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे सार्वजनिक वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आम्ही बोटी ताब्यात घेतल्या नसल्याचे सांगतात. परंतु, तहसीलदार यांनी पंचनामा तयार करून त्यावर ग्रामस्थांच्या स्वाक्षरी घेऊनच वनविभागाच्या ताब्यात दिल्या आहेत.