बोबडे बोल कोणत्याही वयात सुधारता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:24+5:302021-07-02T04:08:24+5:30

अडखळत बोलणारे मुलं नेहमी तोंड दाबून उच्चारण करते. तोंड दाबल्यामुळे हवा व आवाज सहज बाहेर न पडता तोंडातच राहतो. ...

Bobade Bol can be improved at any age | बोबडे बोल कोणत्याही वयात सुधारता येते

बोबडे बोल कोणत्याही वयात सुधारता येते

googlenewsNext

अडखळत बोलणारे मुलं नेहमी तोंड दाबून उच्चारण करते. तोंड दाबल्यामुळे हवा व आवाज सहज बाहेर न पडता तोंडातच राहतो. त्यामुळे बोलताना तोंड फुगणे, डोळे झाकणे किंवा चेहऱ्यावरती विचित्र हावभाव येणे. त्यामुळे एक शब्दपण व्यवस्थित उच्चारण न होणे अशा प्रकारचे बोलणे म्हणजे अडखळत बोलणे होय. बोबडे बोलणारी मुले र, क व श अशा काही अक्षराचा उच्चार ल, त व स असा करतात. अशा प्रकारच्या बोलण्यास आपण बोबडे बोलणे म्हणतो.

पण, अशा खराब बोलण्यासंबंधी बरेच संशोधन चालू आहे. पण, नक्की कारण समजलेले नाही. मानसिक तणाव, मन अस्वस्थ, दुसऱ्याची बोलण्याची नक्कल करणे, आईवडिलांनी खूपच शिस्तीचा बडगा लावणे, मानसिक धक्का बसणे, पटपट बोलणे, घरचे वातावरण नेहमी तणावाखाली असणे, हमेशा मनातील विचार न बोलणे, तासन्तास मोबाईलवर गेम खेळणे, अशा गोष्टीमुळे खासकरून अडखळत किंवा बोबडे बोलणे वाढते.

त्यामुळे ह्या गोष्टीपासून दूर राहणे उपाय उचित ठरतात. खास करून ब्रीद कंट्रोल एक्झरसाइज केल्याने फायदा होतो त्याचबरोबर ध्यान करणे किंवा एक श्वास एक शब्द किंवा एक वाक्य बोलण्याचा सराव करणे हेदेखील उपयुक्त ठरते. खास करून बोलताना श्वास, उच्चारण, स्वतःचा आवाज व बोली संबंधी अवयव त्याच्यावर लक्ष ठेवून उच्चारण करणे खूप उपयुक्त ठरते. माझ्यात बोलण्याचे वैगुण्य आहे व मी अपराधी आहे असे वाटून न घेता त्याचा स्वीकार करून शब्द उच्चारण करताना शब्दाकडे श्वासाकडे व बोलीच्या संबंधी अवयवाकडे लक्ष देणे उपयुक्त ठरेल. अशी खरा बोलण्याची स्वप्रतिमा बदलण्यासाठी स्वतःचा आवाज ऐकणे, स्वतःला आरशात पाहून बोलणे अशा गोष्टीचा सराव पण खूप उपयोगी ठरू शकतो.

मित्रांनो, मी पण स्वतः सात वर्षांपासून ते पस्तीस वर्षांपर्यंत खूप अडखळत बोलायचो, मात्र मी स्वतःला सुधारण्यासाठी सर्वप्रथम घरगुती उपायानंतर गोळ्या औषधी व काही काळानंतर गुगलवरचे सल्ले व यू-ट्युब वरचे एक्झरसाइज पण केले होते. थोडाफार फरक पडत होता. पण नवीन लोकांसमोर काही बोलायचे म्हणले की लगेच अडखळत बोलण्याची समस्या जास्त येत होती किंवा नवीन जागेवर गेलो तरी पण ही समस्या जास्त वाढत होते किंवा एखादा नवीन मुद्दा बोलायचं असला तरीही बोलण्याची समस्या वाढत होती. पण ब्रीद एक्झरसाइज, ध्यान करणे, उच्चारांचे एक्सरसाइज, घशाचे एक्झरसाइज व बोलण्याच्या पद्धतीचे एक्झरसाइज, नियमित हे एक्झरसाइज केल्याने त्यामध्ये सुधारणा होत गेली आज मी अस्सखलीत व स्वच्छ बोलू शकतो. माझ्याबाबत जे घडले त्याच समस्या इतर मुलांमध्ये आहेतच त्या मला जाणवल्या त्यामुळे त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्याचा वसा मी घेतला आणि असंख्य मुलांच्या बोलण्यावर आम्ही काम सुरु केले आहे. त्यासाठीची साई प्रेम फाउंडेशन संस्था स्थापन करून आज अनेक मुलांचे बोल सुधारले आहे. विशेषत: स्पीच थेरपीच्या माध्यमातून हे बोल सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याचा मोठा सकारात्मक परिणाम मुलांवर होतो.

--

अशोक सानप

(लेखक स्पीच थेरपीस्ट आहेत)

Web Title: Bobade Bol can be improved at any age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.