गावात जंगलातील जमिनीत पुरलाय मृतदेह, ग्रामस्थांमध्ये भीतीदायक वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 06:23 PM2021-04-19T18:23:34+5:302021-04-19T18:26:08+5:30
खड्डा खोदताच आढळला कुत्र्याचा मृतदेह
दावडी: खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द येथे वनखात्याच्या हद्दीत कोणाचा तरी मृतदेह जमिनीत पुरला आहे. असे चर्चेला उधाण येऊन गावात भितीदायक वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गाडलेला खड्डा उकरला. मात्र त्यामध्ये कुत्र्याचा मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. पोलिस प्रशासनाची धावपळ थांबली.
खरपुडी येथील खंडोबा देवाची पुजाअर्चा करून पुजारी खंडोबा पाठीमागील मंदिराकडे पुजा करण्यासाठी वन खात्याच्या जंगलातील पाऊलवाटेने जात असतात. काही अंतर गेल्यानंतर पाऊलवाटे लगत झाडाझुडांपामधे काहीतरी जमिनीत पुरले असुन त्यावर काटेरी फांद्या टाकल्या आहेत. फांदयावर दगड गोटे ठेवून त्या ठिकाणी एक टोपी व नारळ ठेवला असल्याचे पुजाऱ्याच्या निर्देशनास आले. देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष सोपान गाडे, राजेश गाडे यांना कळविण्यात आले की, कोणीतरी याठिकाणी खड्डा करून काहीतरी गाडले आहे. त्याचवेळी खड्ड्यात काय पुरले असावे. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे का. असे अनेक प्रश्न ग्रामस्थांसमोर उभे राहू लागले. गावात चर्चेला उधाण आले. तसेच त्या ठिकाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी सुरू झाली. ग्रामस्थांनी खेड पोलिस ठाण्यात कळवताच पोलिस हवालदार सुदाम घोडे , नवनाथ थिटे हे त्यांचा सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांचा मदतीने जमीन उकरण्यास सुरुवात होते. त्यानंतर या खड्यामध्ये एका कुत्र्याचा मृतदेह असल्याचे पोलिस आणि ग्रामस्थांच्या लक्षात येते.