रायगडच्या हॉटेलमध्ये आढळले पुण्यातील बेपत्ता कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 03:18 PM2022-05-19T15:18:40+5:302022-05-19T15:34:10+5:30

मुलांचा खून करून दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज

Bodies of missing pune family members found in raigad hotel | रायगडच्या हॉटेलमध्ये आढळले पुण्यातील बेपत्ता कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह

रायगडच्या हॉटेलमध्ये आढळले पुण्यातील बेपत्ता कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह

googlenewsNext

शिक्रापूर : शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमधून बेपत्ता झालेल्या चौघांचे मृतदेह रायगडमधील एका हॉटेलमध्ये आढळून आले. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून, मुलांचा खून करून दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

जातेगाव बुद्रुक येथून कुणाल चिंतामण गायकवाड (वय २९) हा २ मे २०२२ रोजी बेपत्ता झाला होता. त्यांची पत्नी सपना कुणाल गायकवाड (वय २७ वर्षे रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली होती. शिक्रापूर येथील मलठण फाटा परिसरातून प्रियंका संदीप इंगळे (वय २५) ही महिला तिचे दोन मुले भक्ती संदीप इंगळे (वय ५) व माउली संदीप इंगळे (वय ३) या दोन मुलांसह बेपत्ता होती. याबाबत बेपत्ता महिलेचा पती संदीप आसाराम इंगळे (वय ३४ वर्ष, रा. मलठण फाटा, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली होती. मात्र, याबाबत पोलीस स्टेशन येथे खबर दाखल असताना मंगळवार, दि. १७ सायंकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये चौघांचे मृतदेह आढळून आले. 

दरम्यान, रायगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत पाहणी केली असता येथे भक्ती संदीप इंगळे व माउली संदीप इंगळे यांचे मृतदेह खाली पडल्याचे तसेच कुणाल चिंतामण गायकवाड, प्रियंका संदीप इंगळे या दोघांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेबाबत नेमके कारण काय व कसे घडले, याबाबत सध्यातरी तर्क-वितर्क लढवले जात आहेत, तर शिक्रापूर येथून पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक रायगड येथे गेले आहे.

Read in English

Web Title: Bodies of missing pune family members found in raigad hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.